Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…कपड्याचे माप घेण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील कृत्ये; मनसैनिकांनी शिकवला धडा

अमरावती: कामावर असताना महिलांशी छेडछाड केल्याप्रकरणी चोप बसल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. कितीही कडक शिक्षा असली तरी काही समाजकंटक करायचे तेच करतात. पण अमरावती छेडछाड करणारी एका व्यक्तीला चांगला धडा मिळाला आहे. एका सेक्युरिटी इन्चार्जला महिलांची छेड काढणे फार महाग पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी विनयभंगाचा आरोप करत या 50 वर्षीय व्यक्तीला चोप दिला. मात्र, जास्त मारहाण झाल्याने आरोपी तिथेच बेशुद्ध झाला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महिलांनी केली मनसैनिकांकडे तक्रार

मीडिया रिपोर्टनुसार, 50 वर्षीय सुरक्षा प्रभारी अरुण गावडे अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये काम करत होते. तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी आरोप केला की, गाडवे ड्रेस कोड मोजण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्य करत असत. एवढेच नव्हे, तर आरोपीने विरोध केल्यास महिलांना गोळ्या घालण्याची धमकी दिली, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. नंतर त्या महिलांनी गावडेला धडा शिकवण्याची योजना तयार केली.

पोलिस करत आहेत पुढील तपास

प्राप्त माहितीनुसार, महिलांनी मनसे कार्यकर्त्यांकडे अरुण गावडेबद्दल तक्रार केली. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गावडेला रस्त्यात मध्यंतरी थांबवले. कार्यकर्त्यांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. याशिवाय महिलांनी सुद्धा गावडेवर लाथा-बुक्क्यांचा पाऊस पाडला. मारहाण इतकी झाली की तो तिथेच बेशुद्ध झाला. यानंतर गावडेला कारमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Comments are closed.