Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: ‘पाणीपुरी’ वरून पतीसोबत झाले भांडण, पत्नीने केली आत्महत्या

पुणे: वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये रुसवा फुगवा चालतच राहतो. मात्र बऱ्याच वेळा क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये मोठे भांडण झाल्याच्या घटना आपल्या निदर्शनास येत असतात. बऱ्याच वेळा हे भांडण काही मिटत नाही, परिणामी त्यांचा संसार मोडतो. पण काही वेळा वाद इतका प्रचंड वाढतो की पती-पत्नी एकमेकांच्या जीवाचे बरे वाईट करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. अशावेळी त्यांच्या हातून गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

‘पाणीपुरी’ या विषयावरून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर 23 वर्षीय महिलेने कथितरित्या आत्महत्या केली. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, पतीने पत्नीला न सांगता ‘पाणीपुरी’ घरी आणली होती, तर महिलेने आधीच स्वयंपाक बनवला होता, यावरून त्यांच्यात भांडण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा सरवदे या महिलेचे 2019 मध्ये गहिनीनाथ सरवदे यांच्याशी  लग्न झाले होते. मात्र, दोघांमध्ये नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होत असत.

महिलेने रागाच्या भरात विषारी पदार्थ खाऊन केली आत्महत्या

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या शुक्रवारी पत्नीला न सांगता तिचा पती घरात ‘पाणीपुरी’ घेऊन आला होता. दोघांमध्ये भांडण झाले कारण त्या महिलेने आधीच स्वयंपाक केला होता. न विचारता पाणीपुरी का आणली या विषयावर दोघात वाद झाला. दुसऱ्या दिवशी महिलेने काही विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, रविवारी तिचा मृत्यू झाला. सोमवारी पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

लग्न झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद व्हायचे

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, प्रतीक्षा सरवदे असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव पठार येथे ती तिच्या 18 महिन्यांच्या मुलासह पतीसोबत राहत होती. महिलेच्या वडिलांनी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी गहिनाथला अटक केली आणि मंगळवारी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कालसकर म्हणाले, “2019 मध्ये लग्न झाल्यापासून पती -पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही प्रकरणाची पूर्ण चौकशी करत असून, पुढील तपास सुरू आहे.”

Comments are closed.