IPL 2021: अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य (अफगाणिस्तान संकट) प्रस्थापित झाले आहे. राष्ट्रपतींपासून सरकारमधील सर्व मोठे मंत्री देश सोडून गेले आहेत. अफगाणिस्तान मधील सद्यस्थिती पाहता अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान आणि अष्टपैलू मोहम्मद नबी 19 सप्टेंबरपासून UAE मध्ये सुरू होणाऱ्या IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळातील की नाही, असा प्रश्न निर्माण होत होता.
SRH व्यवस्थापनाने दिली माहिती
मात्र, यावर महत्वाची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएल मध्ये सनरायजर्स हैदराबाद (SRH) या संघासाठी खेळतात. SRH व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, राशिद खान आणि मोहम्मद नबी दोघेही आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यासाठी उपलब्ध असतील.
SRH चे सीईओ एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना सनरायझर्स हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शानमुगम म्हणाले की, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आमच्या संघाचा भाग असतील. आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या देशातील परिस्थितीबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. पण हे दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी उपलब्ध असतील.
सध्या राशिद आणि नबी ‘द हंड्रेड‘ मध्ये खेळत आहेत
रशीद आणि नबी यावेळी अफगाणिस्तानात नाहीत. ते दोघे इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत आहेत. राशिद ट्रेंट रॉकेट्सचे प्रतिनिधित्व करत आहे आणि मोहम्मद नबी लंडन स्पिरिटसाठी खेळत आहे. बीसीसीआय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये भाग घेतील अशी आशा आहे.
Comments are closed.