जेव्हा वाजपेयी म्हणाले होते; अविवाहित आहे पण ब्रह्मचारी नाही, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से
भारताच्या इतिहासातील सर्वात प्रतिभाशाली पंतप्रधानांच्या यादीत अटल बिहार वाजपेयी यांचे चित्र डोळ्यासमोर येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे सार्वजनिक आणि खाजगी आयुष्य अगदी यशस्वीपणे वेगळे ठेवले होते. जवळजवळ 4 दशके ते एक महान वक्ते आणि एक हुशार कवी म्हणून लोकांमध्ये परिचित होते. परंतु या व्यतिरिक्त, त्यांचे स्वतःचे एक लहान वैयक्तिक जग देखील होते.
फार कमी लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत माहिती आहे. आज त्यांची तिसरी पुण्यतिथि आहे, या निमित्ताने आपण या लेखात त्यांच्या आयुष्यातील असेच काही रंजक किस्से जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही!
अटल बिहारी वाजपेयी एक निर्भीड आणि स्पष्टवक्ते राजकारणी होते. त्यांचा हजरजबाबीपणा फार प्रसिद्ध होता. एकदा वाजपेयींना एका पत्रकाराने त्यांच्या लगणविषयी बोलत असताना प्रश्न केला होता. पत्रकाराने अटलजींना विचारले होते, “तुम्ही अजूनही ब्रह्मचारी आहात का?” पहिल्यांदाच त्यांच्या खाजगी आयुष्यावर थेट प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी म बिचकता जे उत्तर दिले होते, त्यांच्या उत्तराने सर्वजण हैराण झाले होते. त्या प्रश्नाचे उत्तर देतान अटलजी म्हणाले होते की, “मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही!”
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालियर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण ग्वालियर येथी विक्टोरिया कॉलेज आणि कानपुर येथील डीएव्ही कॉलेज मध्ये झाले.
पत्रकार म्हणूनही केले काम
त्यांनी राज्यशास्त्र या विषयात MA केले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता सुरू केली होती. त्यांनी राष्ट्र धर्म, पाचगण्य आणि अर्जुन वीर या साप्ताहिकांचे संपादन केले होते. 1951 मध्ये ते भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य बनले.
त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 3 ठिकाणी उभे राहिले होते
1957 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जनसंघाने लखनऊ, मथुरा आणि बलरामपूर या तीन लोकसभा जागांवर उभे केले होते. त्यांनी दोन जागा गमावल्या आणि बलरामपूरमधून जिंकून लोकसभा गाठली. येथूनच त्यांची संसदीय कारकीर्द सुरू झाली होती.
Comments are closed.