Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…व्हॉट्सअप वापरकर्त्यांना येत आहे मोठी समस्या; काळजी घेण्याची आहे गरज, समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

टेक: व्हॉट्सअप हे एक प्रसिद्ध इन्स्टंट चॅटिंग अॅप आहे. भारतातील जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स व्हॉट्सअप वापरत असतात. परंतु बर्‍याच वापरकर्त्यांना सध्या एक मोठी समस्या जाणवत आहे. अँड्रॉइडवरील काही व्हॉट्सअप वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत आहे. बर्‍याच जणांचे खाते अचानकपणे लॉगआऊट झाले आहे. तसेच बर्‍याच जणांना त्यांचे व्हॉट्सअप खाते अस्तित्वात नसल्याचे संदेश आले आहेत.

खाजगी संवेदनशील डाटा चोरी होऊ शकतो

जेव्हा तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून इतर मोबाइलवर व्हॉट्सअपची नोंदणी केली जात असेल, तेव्हा अशा समस्या येतात. जर तुम्ही असे केले नसेल तर तुम्हाला परत तुमच्या मोबाईलवर नोंदणी करून वेरिफाय करावी लागेल. तसेच बर्‍याच अहवालात व्हॉट्सअप वापरकर्त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलमधील खाजगी डाटासोबत हॅकर्स ने काड्या केल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

व्हॉट्सअप अचानक बंद होणे निश्चितच चिंतेचे कारण आहे, विशेषत: जेव्हा बहुतेक व्हॉट्सअप वापरकर्ते व्हॉट्सअपवर कोणाशी तरी बोलत असतात. वापरकर्त्यांचे संवेदनशील फोटो, व्हिडिओ, पासवर्ड इत्यादींचा हॅकर्सद्वारे गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व वापरकर्त्यांसाठी ही एक मोठी समस्या बनत आहे.

चुकूनही ‘ही’ चूक करू नका

अशा घटनांमुळे सर्वांनी सतर्क होणे गरजेचे आहे. व्हॉट्सअप वापरकर्त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हॅकर्स त्यांचे पैसे किंवा ऑनलाइन ओळख चोरण्यासाठी सतत फिशिंग करत आहेत. कॅस्परस्कीने आपल्या ताज्या अहवालात खुलासा केला आहे की व्हॉट्सअप वापरकर्त्यांवर अशे हल्ले अनेक पटीने वाढले आहेत. व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अनोळखी लोकांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे. कारण या लिंक्सद्वारे त्यांचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि सर्व खाजगी माहिती तसेच ऑनलाइन बँकिंग संबंधित माहिती चोरण्यात येते. यामुळे प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

 

Comments are closed.