Take a fresh look at your lifestyle.

अबब… WhatsApp ला मोठा झटका; भरावा लागणार तब्बल २० अब्ज रुपये दंड, कारण ऐकून विश्वास बसणार नाही

टेक : प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhastApp ला मोठा धक्का बसला आहे. फेसबुकचचे मालकी हक्क असणाऱ्या इतर  कंपन्यांसोबत वैयक्तिक डेटा शेअर केल्याची चौकशी केल्यानंतर आयर्लंडमध्ये WhastApp ला गुरुवारी विक्रमी 225 दशलक्ष युरो (जवळपास २० अब्ज रुपये) दंड ठोठावण्यात आला. आयर्लंडच्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटर म्हणजेच डेटा प्रायव्हसी कमिशनरने हा दंड ठोठावला आहे.

आम्ही या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहोत : WhatsApp  प्रवक्ते 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार,फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने  सांगितले की हा दंड पूर्णपणे विसंगत असून, कंपनी लवकरच कंपनी या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहे.

WhastApp च्या  प्रवक्त्याचे म्हणणे आहे की ते सुरक्षित आणि खाजगी प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्हाला खात्री आहे की आम्ही पुरवलेली माहिती पारदर्शक आणि सर्वसमावेशक आहे. 2018 मध्ये लोकांना देण्यात आलेल्या पारदर्शकतेबद्दल आजच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आणि दंड पूर्णपणे विसंगत असल्याचेही ते म्हणाले.

WhatsApp ने फक्त 46 दिवसांत३० लाखांपेक्षा जास्त भारतीय खात्यांवर बंदी घातली

दरम्यान , WhastApp ने जाहीर केले आहे की त्यांनी 16 जून ते 31 जुलै या 46 दिवसांत 30 लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. WhastApp ने म्हटले आहे की 16 जून ते 31 जुलै दरम्यान 30,27,000 भारतीय खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की या काळात त्यांना 594 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यावर कंपनीने कारवाई केली आहे. यापैकी बहुतेक खाती स्वयंचलित किंवा मोठ्या प्रमाणात संदेश पाठवल्यामुळे (Bulk Messages )निलंबित केली गेली आहेत.

भारतात WhatsApp ने सरकारच्या नवीन नियमा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका 

यापूर्वी भारतात नवीन IT  नियम आल्यानंतर WhatsApp ने सर्वोच्च  न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी नवीन IT  नियम हे नागिरकांचे प्रायव्हसी आणि सुरक्षा या मूलभूत हक्कनवर गाडा आणत असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे स्वतः नागरिकांचा खाजगी डेटा इतर कंपन्यांना शेअर केल्याबद्दल त्यांना आयर्लंड मध्ये तब्बल २० अब्ज रुपायांचा दंड भरण्याची वेळ आली आहे.

Comments are closed.