Take a fresh look at your lifestyle.

टेनिस व्हॉलीबॉल खेळ रुजविण्यात यश.सेलू येथील कार्यक्रमात क्रीडा संशोधक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांचे मत

सेलू (डाॅ विलास मोरे) :- क्रीडाक्षेत्रात नवनवीन संशोधन करणे ही कठीण व आव्हानात्मक प्रक्रिया आहे. परंतु मनात नवनिर्माणाची उर्मी आणि सामूहिक प्रयत्न केले तर नवनवीन क्रीडाप्रकार शोधून ते देशभर रुजविण्यात नक्कीच यश मिळते. हे भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळाला देशासह आशियाई देशांमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून आणि संवर्धनातून दिसून येते. असे मत पुणे येथील क्रीडा संशोधक तथा टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सेलू येथील नूतन महाविद्यालयात आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी होते. टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य सचिव गणेश माळवे, जिल्हा पदाधिकारी चंद्रशेखर नावाडे, प्रा.किशोर देशमुख तसेच माधव लोकुलवार, संदीप लहाने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

परभणीच्या क्रीडा क्षेत्रातून मोठी उर्जा मिळते. असे नमूद करून डॉ.वांगवाड म्हणाले की बाहेर देशातील नवीन खेळाला लोक कुतूहलाने तात्काळ स्विकारतात. पण देशी संशोधकांनी निर्माण केलेल्या नवीन खेळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला तरच देशातील क्रीडा संशोधनाला चालना मिळेल. असेही डॉ.वांगवाड यांनी स्पष्ट केले.

यावेळी टेनिस व्हॉलीबॉल महासंघाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, सहसचिव डॉ.व्ही.के.कोठेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थां, संघटनांतर्फे डॉ.वांगवाड यांचा परभणी व सेलूत गौरव करण्यात आला. तर क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य सुदाम लाड, पी.आर.जाधव, प्रा. प्रसेनजित बनसोडे, कृष्णा शिंदे, सतीश नावाडे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी संगिता खराबे, सुभाष मोहकरे, राजेश राठोड, डॉ.कैलास आवटे, गिरीश लोडाया, बाबासाहेब हेलसकर, किशोर ढोके, बाबासाहेब खरात उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.नागेश कान्हेकर सूत्रसंचालन प्रा.शिवराज घुलेश्वर, तर माळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलेश नावाडे, गजानन शिंदे, सिध्दार्थ लिपने, सूरज शिंदे, नीलेश माळवे, कुणाल टाक, केशरखाने आदींनी पुढाकार घेतला.

Comments are closed.