Take a fresh look at your lifestyle.

निराशाजनक: विराट कोहली पाहिल्याच चेंडूवर बाद, पहा विडिओ

Ind vs Eng: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विराट कोहलीची सुरुवात फार वाईट झाली, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. विराट कोहली नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीकडून या मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित होती पण भारतीय कर्णधार गोल्डन डकवरच पॅव्हेलियनमध्ये परतला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहलीची विकेट महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने घेतली. जेम्स अँडरसनच्या आउटस्विंग बॉलने बाद झाल्यावर विराटला विश्वास बसत नव्हता.

नॉटिंगहॅम कसोटीत टीम इंडियाने फक्त एक विकेट गमावून 100 धावा केल्या होत्या, पण 41 व्या षटकात जेम्स अँडरसनने केलेल्या पराक्रमामुळे भारतीय संघात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने चेतेश्वर पुजाराला बाद केले आणि लगेच तिसऱ्या चेंडूवर त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली.

इथे पहा विडिओ:

विराट कोहली-अँडरसनचा ‘सामना’

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच सर्व चाहते विराट-अँडरसनच्या सामन्याची वाट पाहत होते. जेव्हा विराट कोहलीला विचारण्यात आले की तो अँडरसनचा सामना कसा करणार? तर यावर विराटने फलंदाजी करून सामना करणार असे म्हटले होते. पण कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात अँडरसनने विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले. अँडरसनने 2014 मध्ये देखील विराट कोहलीला खूप त्रास दिला होता. इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीने अँडरसनचे 50 चेंडू खेळले आणि चार वेळा त्याच्या गोलंदाजीवर विकेट गमावली.

पण 2018 मध्ये विराट चांगली तयारी करून आला आणि त्याने अँडरसनच्या गोलंदाजीवर 270 चेंडूत 114 धावा केल्या आणि त्याला एकदाही आपली विकेट दिली नाही. पण 2021 च्या मालिकेत अँडरसनने कोहलीला बाद करत पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवली आहे. आता प्रश्न असा आहे की, विराट कोहली त्याला कधी उत्तर देणार?

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका