Take a fresh look at your lifestyle.

IND vs ENG: या मालिकेत विराट कोहली बनवू शकतो ‘हे’ मोठे विक्रम, पाँटिंग-लॉयडला टाकू शकेल मागे

लंडन: भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ विजयासह दुसरे डब्ल्यूटीसीचे (world test championship) दुसरे पर्व सुरू करू इच्छितो. या व्यतिरिक्त, कोहली त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी आतुर असेल. कसोटी मालिकेत कोहली फलंदाजीमध्ये अनेक मोठे विक्रम बनवण्याच्या मार्गावर आहे. या लेखात कोहली कोणकोणते रेकॉर्ड मोडू शकतो ते जाणून घेऊया …

8000 कसोटी धावा: कोहलीने आतापर्यंत 92 कसोटी सामन्यांमध्ये 7547 धावा केल्या आहेत. त्याला 8000 धावांचा आकडा पार करण्यासाठी 453 धावांची गरज आहे. कोहलीने गेल्या इंग्लंड दौऱ्यात (2018) पाच कसोटी मालिकेत 593 धावा केल्या होत्या. जर कोहलीने पूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली तर तो हा विक्रम सहज करेल.

इंग्लंडविरुद्ध 2000 कसोटी धावा: कोहलीने इंग्लिश संघाविरुद्ध 23 कसोटी सामन्यात 1742 धावा केल्या आहेत. कोहली 2016 पासून इंग्लंडविरुद्ध चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत 258 धावा करून कोहली सचिन तेंडुलकर (2535) आणि सुनील गावस्कर (2483) च्या लीगमध्ये येईल. दुसरीकडे राहुल द्रविड (1950) आणि गुंडप्पा विश्वनाथ (1880) यांना मागे टाकेल.

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके: आणखी फक्त एका शतकासह कोहली केवळ त्याच्या प्रदीर्घ शतकाचा दुष्काळच मोडून काढणार नाही, तर कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही करेल. सध्या, कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (41 शतके) सह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकांची नोंद केली आहे. फक्त सचिन तेंडुलकर (100) आणि रिकी पाँटिंग (71) त्याच्या पुढे आहेत. या मालिकेत दोन शतके झळकावल्यानंतर कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

क्लाइव्ह लॉयडला टाकेल मागे : आणखी एका कसोटी विजयासह कोहली क्लाइव्ह लॉईडचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम मागे टाकेल. कोहली आणि विंडीजचे माजी कर्णधार दोघांनीही 36-36 कसोटी सामने जिंकले आहेत. एका विजयासह, कोहली 5 वा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनेल.

सेना देशांमध्ये सर्वाधिक यशस्वी आशियाई कर्णधार: आणखी एका विजयासह कोहली SENA देशांविरुद्ध (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार बनेल. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि कोहली दोघांनी SENA देशांमध्ये प्रत्येकी चार कसोटी सामने जिंकले आहेत.

Comments are closed.