Take a fresh look at your lifestyle.

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे १५ नगरसेवकांसह काँग्रेसमध्ये दाखल..

नगर पालिकेच्या निवडणुकीत समिकरणे बदलणार

सेलू :- येथील नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपल्या १५ नगरसेवकांना सोबत घेऊन मुंबई येथे रविवारी ता १३ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

गेल्या पंचवार्षिक मध्ये विनोद बोराडे यांनी स्वतंत्र जनविकास आघाडी स्थापन करून अपक्ष निवडणूक लढवून सेलू नगर पालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र यावेळी आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व निवडणुक काळात बदलणारी समिकरणे लक्षात घेता विनोद बोराडे यांनी आपल्या १५ नगरसेवकांसह टिळक भवन मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार सुरेश वरफुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, सेलू काॅग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, मिलींद सावंत, खाॅजाभाई प्रभाकर सुरवसे, मारोती चव्हाण, अशोक मंत्री, साईराज बोराडे, शिवाजी खेडकर, शेख रहिम, सतीश जाधव ,सचीन कोरडे, शेख कासीम, आयुब खान पठाण, विठ्ठल काळबाडे, गौतम धापसे, बबन गायकवाड, वहिद अन्सारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विनोद बोराडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणूकीत समिकरणे बदलणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.