Take a fresh look at your lifestyle.

सेलू नगर परिषदेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड शनिवारी दिल्लीत होणार पुरस्कार वितरण

सेलू (डाॅ विलास मोरे) : केंद्रशासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये सेलू शहराची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून नवी दिल्ली येथे स्वच्छ अमृत महोत्सव सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पालिकेचा गौरव होणार आहे. प्रशासनाच्या वतीने अशोक कासार यांनी ही माहिती दिली.

याआधी पश्चिम विभागात २०१८ मध्ये सेलू शहर ११९ व्या, २०१९ मध्ये ६२ व्या, तर २०२० मध्ये देशात २६ व्या क्रमांकावर होते. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरात सेलू शहराचा दर्जा पूर्वीपेक्षा वाढला असून थ्री स्टार नामांकन प्राप्त झालेले आहे. २० नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेले आहे. २० नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित स्वच्छ अमृत महोत्सव- पुरस्कार सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले असून नगराध्यक्ष विनोद बोराडे व मुख्याधिकारी नीलेश सुकेवार हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.

दरम्यान पालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे शहराच्या स्वच्छते विषयक दर्जात वाढ झालेली आहे. सर्व सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक सचिन घुले, समन्वयक कैलास कापुरे, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान तसेच नागरिकांचे सहकार्य यासाठी लाभले आहे. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राखण्यासाठी या पुढेही कटिबद्ध राहू असे नमूद करून नगराध्यक्ष बोराडे यांनी जनतेचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.