Take a fresh look at your lifestyle.

वसंत बापट यांनी कवितेतून मानवता धर्म जागविला ! व्याख्यानमालेत डाॅ शिंदे यांचे प्रतिपादन

सेलू (डाॅ विलास मोरे) :- आपल्या कवितेमधून सामाजिक जाणिवांचे मुख्य चिंतन मांडत स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांची रुजवण केली. कविवर्य वसंत बापट हे मानवताधर्म जागविणारे कवी होते. असे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ इच्छा शिंदे यांनी केले.

चार दिवस चाललेल्या हीरकमहोत्सवी गणेशोत्सव व्याख्यानमालेची सांगता नूतन महाविद्यालयाच्या प्र.या. तरफदार सभागृहात आयोजित कवी संमेलनाने झाली, त्यावेळी शिंदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, व्याख्यानमालेचे अध्यक्ष नारायण सोळुंके, चिटणीस गिरीश लोढाया यांची उपस्थिती होती. यावेळी कवी अशोक पाठक, सुरेश शेवाळे, शरद ठाकर, डॉ अंजली जाधव, दिगंबर रोकडे, गौतम सूर्यवंशी, अश्विनी विटेकर अरुणा बागले, कीर्ती राऊत यांनी कविवर्य वसंत बापट यांच्या एकाहून एक सरस कवितांचे बहारदार सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

सूत्रसंचालन संयोजक प्रा नागेश कानेकर आणि प्रा ए डी कुलकर्णी यांनी केले ऑनलाइन प्रसारणासाठी प्रा देवदास ढेकळे, गंगाधर कानेकर, प्रकाश काळबांडे, राजू फरीद खाने, प्रभू सोळंके यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य शरद कुलकर्णी, बाबासाहेब चारठाणकर, कल्याण पवार, विलास मोरे, किशोर कटारे, बाबासाहेब हेलसकर, गणेश माळवे, डॉ काशिनाथ पल्लेवाड, अजित मंडलिक, मंजुषा बोराडे, मीरा बहीवाल, रूपा काला, प्रणिता सोलापूर, गुरु बसप्पा पंचले यांनी पुढाकार घेतला.

Comments are closed.