Take a fresh look at your lifestyle.

मानवाला सुखी करण्याचे सामर्थ्य ज्ञानात आहे ! ह.भ.प.वनिता पाटील

सेलू (डाॅ विलास मोरे) :- ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान या तिन्ही गोष्टी जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत. जीवनातील प्रापंचिक अंग सांभाळून संसार सुरुळीत चालवण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. वनिता पाटील यांनी किर्तनरूपी प्रबोधन प्रसंगी सेलू येथे केले.

सेलू येथील श्री साईबाबा मंदिर संस्थान समितीच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त अत्याधुनिक व भव्य बांधण्यात आलेल्या श्री साई मंडपाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. १५ ते २१ नोव्हेंबर दरम्यान महिला मंडळांचे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गुरूवारी ता. १८ नोव्हेंबर रोजी भिवंडी (मुंबई) येथील प्रसिद्ध महिला किर्तनकार वनिता पाटील यांचे किर्तनरूपी प्रबोधन झाले. यावेळी त्या म्हणाल्या की, ज्ञान हाच देव आहे तर अज्ञान हा सैतान आहे. जीवन जगत असताना मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे आलेल्या प्रत्येक प्रसंगावर मणुष्य मात करू शकतो.

म्हणून ज्ञानाला पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा नेहमी ज्ञान संपादन करण्यावर भर दिला पाहिजे असा मौलिक सल्ला यावेळी त्यांनी दिला. कीर्तनाच्या समारोपानंतर लगेचच महाआरती करून भव्य दिपोत्सव करण्यात आला यावेळेस प्रंचड जनसमुदाय उपस्थित होता.

Comments are closed.