Take a fresh look at your lifestyle.

नारायण राणेंचा जीव धोक्यात असल्याचा भाजपचा दावा; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने म्हटले- त्यांना ‘शॉक ट्रीटमेंट’ची गरज

मुंबई: आज दिवसभरात राजकीय घडमोडींना फार वेग आला होता. नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे आमदार प्रसाद लाड पोलिस कोठडीत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जीवाला धोका आहे दावा केला. भाजपचे विधान परिषद सदस्य (MLC) प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना पोलिसांनी नारायण राणे यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

त्यांना शॉक ट्रीटमेंटची गरज आहे

प्रसाद लाड यांच्या आरोपांना उत्तर देताना राज्यमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, राणे यांनी त्यांचे “मानसिक संतुलन” गमावले असल्याने त्यांना “शॉक ट्रीटमेंट” दिली पाहिजे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “भारताचे स्वातंत्र्य वर्ष विसरल्याबद्दल” थापड मारण्याचे वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. लाड म्हणाले, “राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. ते सुमारे 70 वर्षांचे आहेत. अशा ज्येष्ठ व्यक्तीला असे वागवले जाते का? वाटते की त्यांच्या जीवाला धोका आहे.”

भाजपने उद्धव सरकारवर केला हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून मंगळवारी भाजपने राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे महाराष्ट्र युनिटचे प्रमुख चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे यांचे अटक वॉरंट दाखवण्यास एमव्हीए सरकार घाबरत आहे. राज्य सरकारच्या या कारवाईला त्यांनी राजकीय सूड म्हणून संबोधले. मात्र, पाटील यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले, ‘मी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, परंतु जर त्यांना अटक करण्यात आली किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले गेले, तर त्यांच्या (एमव्हीए सरकार) नेत्यांचे काय होत आहे? जे घटनात्मक पदावर बसलेल्या राज्यपालावर टीका-टिप्पणी करत असतात.

भाजप नारायण राणे यांच्या पाठीशी उभी आहे

चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नारायण राणेंच्या विधानाचे समर्थन न करता राज्य सरकारवर हल्ला चढवला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, “आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचे (उद्धव ठाकरे यांच्या विरोधात) समर्थन करत नाही, पण एक व्यक्ती आणि एक पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. शरजील उस्मानीने भारतमातेला शिवीगाळ केली, पण त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला गेला नाही, परंतु तुम्ही (राज्य सरकार) नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.”

Comments are closed.