Take a fresh look at your lifestyle.

उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर ५० वर्षीय इसमाचा गट्टूने ठेचून खून

सेलू :- शहरातील विद्यानगर परिसरात पूजा नावाच्या बहिणीकडे राहत असलेल्या विशाल रामदास सदाफळे (वय ५० वर्षे) याचा अज्ञात इसमाने गट्टू आणि विटा डोक्यात घालून खून केल्याची घटना मंगळवारी १ मार्च रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौरे, गजानन गवळी, बालासाहेब लिंगायत या पथकाने यांनी भेट देवून पंचनामा केला असून श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती या प्रमाणे सेलू शहरातील विद्यानगर मध्ये पूजा रामदास सदाफळे (वय ३१ वर्षे) या बहिणीकडे राहात असलेल्या विशाल नावाच्या ५० वर्षीय इसमाचा डोक्यात गट्टू आणि विटा मारून उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट जवळ खून करण्यात आला. ही घटना २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असावी. विशाल हा शहरातील एका धाब्यावर काम करत होता. खुनाचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या खुनाच्या घटनेनंतर शहरात मात्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पुजा सदाफळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड पुढील तपास करत आहेत. उपजिल्हा रूग्णालय परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे रात्री अपरात्री गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. याठिकाणी सुरक्षा गार्डची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.