जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘मला योगी आदित्यनाथला चप्पलीने मारू वाटले’; जाणून घ्या नेमकं प्रकरण
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी आज अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी त्यांना आज दुपारी अटक करण्यात आली आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केली होती. त्यांच्या ह्या वक्तव्यानंतर नाशिक, पुणे, रायगड इत्यादि अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या.
या आधीही मुख्यमंत्र्याला मारण्याचे वक्तव्य करण्याच्या घटना झाल्या आहेत
राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र असे पहिल्यांदा झाले नाही जेव्हा एका नेत्याने दुसर्या नेत्याला मारण्याची भाषा केली. आज चर्चेचा विषय जरी नारायण राणे असले तरी मुख्य प्रकाश झोतात उद्धव ठाकरे देखील आहे. ज्या उद्धव ठाकरेंना नारायण राणे यांनी कानाखाली मारण्याची भाषा केली होती, त्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा एकदा अशीच भाषा वापरली होती. तर जाणून घेऊया तो किस्सा…
तीन वर्षापूर्वी मे 2018 मध्ये योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौर्यावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सामना मुखपत्राद्वारे योगी आदित्यनाथ यांना चप्पलीने थोबाडीत हाणावं वाटलं, असे म्हटले होते.
नेमकं काय प्रकरण होतं?
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मे 2018 मध्ये पालघर येथे आले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घातला होता. परंतु, फोटोला हार घालत असताना त्यांच्या पायात चप्पल होती. या गोष्टीने नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपली प्रतिक्रिया दिली होती.
उद्धव ठाकरे म्हणाले होते, “योगी आदित्यनाथ हे एक पाखंडी मुख्यमंत्री आहेत. ते योगी नसून भोगी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालताना त्यांनी चप्पल काढली नव्हती. तीच चप्पल काढून त्याच्या थोबाडीत मारावी असं मला वाटत होतं.”
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची तेव्हा चर्चा झाली पण प्रकरण तेवढं वाढलं नव्हतं. मात्र याउलट नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले आणि परिणामी त्यांना अटक झाली. नारायण राणे यांना ज्या गोष्टीसाठी अटक झाली तशी उद्धव ठाकरे यांना पण अटक होईल का असे काही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज्यात तापलेले राजकीय वातावरण कधी थंड होईल आणि सरकार जनतेच्या मूळ मुड्ड्यांकडे लक्ष देईल याची सामन्या जनता वाट प्पाहात आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या अटकेला भाजप नेत्यांनी लोकशाहीची हत्या असे संबोधले आही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही नारायण राणे यांच्या विधानाशी सहमत नाही, मात्र नारायण राणे यांच्या पाठीशी आहोत म्हटले आहे.
Comments are closed.