Take a fresh look at your lifestyle.

अरे वाह! ‘या’ गावातील प्रत्येक व्यक्तीचे झाले लसीकरण; जाणून घ्या या गावाचे राहुल गांधींसोबतचे संबंध

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीती दरम्यान, देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, अनेक लोक अजूनही लस घेण्यास घाबरत आहेत. दरम्यान, केरळमधील एका गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण (Fully Vaccinated Village in India) पूर्ण झाले आहे. वायनाड जिल्ह्यातील नुलप्पुझा, सर्व प्रौढ नागरिकांचे कोविड -19 चे संपूर्ण लसीकरण करण्याचा पराक्रम करणारी राज्यातील पहिली आदिवासी पंचायत बनली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, पंचायतीच्या विविध भागांतील पाच शाळांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. लसीकरणाचा डोस देण्यासाठी आदिवासी विभागाच्या वाहनांद्वारे लोकांना लसीकरण केंद्रात आणण्यात आले. त्यांनी सांगितले की जे शिबिरात पोहोचू शकले नाहीत त्यांना वस्त्यांमध्ये जाऊन लसीचे डोस देण्यात आले.

 

या लोकांना देण्यात आली नाही लस

त्यांनी सांगितले की जे लोक मागील तीन महिन्यांत संक्रमित झाले आहेत किंवा संक्रमित लोकांच्या थेट संपर्क यादीत आहेत, त्यांना लसीचा डोस दिला गेला नाही. तसे, या जागेचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी विशेष संबंध आहेत. राहुल गांधी हे वायनाडचे खासदार आहेत.

देशभरात कोरोना लसीकरणाचा वेग किती?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या लसीचे 50,68,10,492 डोस देण्यात आले आहेत. या वर्षाअक्षर सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचे मानस आहे. तसेच 12 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.