Take a fresh look at your lifestyle.

टिम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने मुंबई मध्ये घेतले तब्बल 30 कोटीचे घर, कधी काळी फक्त मॅग्गी खाऊन भरायचा पोट

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. सुरूवातीला अतिशय गरीब असणारे हे खेळाडू नंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडो रुपये कमावले. यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचाही समावेश आहे.

हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या आयुष्यात खूप आर्थिक तंगी पहिली आहे. हे दोघे इतरांची खेळाडू बॅट उधार घेऊन क्रिकेट खेळत असत. तसेच दोन्ही भाऊ पोट भरण्यासाठी मॅगी खाऊन दिवस काढत असत. पण आज हार्दिक आणि कृणाल हे खूप यशस्वी क्रिकेटपटू आहेत. टीम इंडिया मध्ये एन्ट्री आणि आयपीएल मधील अप्रतिम कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंनी खूप प्रसिद्धी आणि पैसे कमावले आहेत.

दरम्यान, कृणाल आणि हार्दिक पंड्या यांनी मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत 30 कोटी रुपये असून, हार्दिक पंड्याच्या या फ्लॅटमध्ये 8 बेडरुम आहेत आणि ते 3838 स्क्वेअर फूटमध्ये बांधले गेले आहे. पंड्या बंधूंनी रुस्तमजी पॅरामाउंट, मुंबई येथे हा फ्लॅट खरेदी केला आहे. बॉलीवूड अभिनेते टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी देखील या सोसायटीत राहतात.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, हार्दिक आणि कृणाल पंड्याच्या या घरात जिम, गेमिंग झोन सोबतच  स्विमिंग पूल सुद्धा आहे. एवढेच नाही तर पंड्या बंधूंच्या अपार्टमेंटमध्ये एक थिएटर देखील आहे. लवकरच पंड्या बंधू वडोदराहून मुंबईला शिफ्ट होणार असल्याचे कळते.

पांड्या बंधू, ज्यांना एकेकाळी एका सामन्यासाठी फक्त 400 ते 500 रुपये मिळायचे. ते आता भारतीय सांगहतील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहेत, म्हणूनच त्यांच्यावर पैश्यांचा पाऊस पडत आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका