Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ दिवस ‘मुस्लिम महिला हक्क दिन’ म्हणून साजरा केला जाईल; मुख्तार अब्बास नकवी यांची माहिती

नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी  “तिहेरी तलाक” हा कायदेशीररित्या गुन्हा घोषित करण्यात आला. आता केंद्र सरकारने ज्या दिवशी “तिहेरी तलाक” हा गुन्हा घोषित करण्यात आला होता तो दिवस, म्हणजे  1 ऑगस्ट हा दिवस “मुस्लिम महिला हक्क दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिहेरी तलाक देण्याच्या घटना कमी झाल्या…

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 1 ऑगस्ट 2019 रोजी “तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिद्दत” यास कायदेशीर गुन्हा म्हणून घोषित केला होता. त्यामुळे मागील दोन वर्षात देशातील तिहेरी तलाक देण्याच्या घटनांची संख्या कमी झाली आहे. देशभरातील महिलांनी या गोष्टीचे समर्थन केले आहे.”

दिल्लीत होणार कार्यक्रम…

उद्या 1 ऑगस्ट रोजी विविध संघटनांद्वारे ‘मुस्लिम महिला हक्क दिन’ साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री, स्मृती इराणी 1 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे “मुस्लिम महिला हक्क दिन” निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादवसुद्धा उपस्थित राहतील.

मुस्लिम महिलांचे हक्क सुनिश्चित…

नकवी म्हणाले की, तिहेरी तलाक यास कायदेशीर गुन्हा बनवून, मोदी सरकारने मुस्लिम महिलांचे “स्वावलंबन, स्वाभिमान, आत्मविश्वास” बळकट करून त्यांचे घटनात्मक-मूलभूत-लोकशाही आणि समानतेचे हक्क सुनिश्चित केले आहेत.

महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक जुलै, 2019 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 1 ऑगस्ट 2019 रोजी या विधेयकाला मंजुरी दिली होती. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर तिहेरी तलाक हा कायदेशीर गुन्हा ठरला आहे.

Comments are closed.