Take a fresh look at your lifestyle.

नगरमध्ये कांदा लिलाव सुरु राहणार शिवाजीराव कर्डीलेच्या मध्यस्थीने निघाला तोडगा.

नगर : कांद्याची वारई व्यापाऱ्यांनी द्यावी, अशी भूमिका वाहतूकदारांनी घेतली. देशात असा नियम नाही. वारई वाहतूकदारकडूनच घेतली जाते, असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २) नगर बाजार समितीच्या नेप्ती बाजारात वादंग झाले. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने कांद्याची वाहतूक न करण्याचा निर्णय घेतल्याने नेप्ती उपबाजारामधील काहीकाळ कांदा लिलाव बंद झाले. वाद तात्पुरता मिटला,

परंतु कांद्याची वाहतूक न करण्याचा निर्णय घेतल्याने आज, शनिवारी (ता. ४) कांदा लिलाव बंद ठेवण्याचा इशारा अहमदनगरओनियन मर्चंट असोशिएशनने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत पत्र दिले. मात्र आज (शुक्रवारी) दुपारी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या उपस्थितीत बाजार समितीत वाहतुकदार व कांदा व्यापारी असोशिएशन यांची बैठक झाली. आठ दिवसानंतर होणाऱ्या अंदोलनात काय निर्णय होईल ते पाहू पण सध्या कांदा लिलाव सुरु करा अशी विनंती केल्यानंतर ती मान्य करत उद्या (शनिवारी) कांदा लिलाव सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात वारई देण्यावरून कांदा व्यापारी व वाहतूकदारांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. नेप्ती उपबाजारामध्ये नेहमीप्रमाणे गुरुवारी कांद्याचे लिलाव सुरू होणार होते. व्यापारी संघटना व वाहतूकदार संघटना यांच्यात वाराईवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेचा गुरुवारी अंतिम टप्पा झाला. या टप्प्यात दोन्ही बाजूंमध्ये समझोता होण्याऐवजी वादंग झाल्यामुळे वाहतूकदार संघटनेने कांद्याची वाहतूक न करण्याचा निर्णय घेऊन, कांदा वाहनांमध्ये भरण्याची प्रक्रिया थांबविली.

वाहतूकदार संघटनेने बाजार समितीला कुठलेही निवेदन न देता व चर्चा न करता थेट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हा तणाव निर्माण झाला होता. दादा पाटील शेळके बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालकांनी मध्यस्थी केल्याने लिलाव झाले. वाद तात्पुरता मिटला, परंतु देशात असा नियम नाही. वारई वाहतूकदारकडूनच घेतली जाते. यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही शनिवारपासून कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्डीलेच्या मध्यस्थीने कांदा लिलाव सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.