Take a fresh look at your lifestyle.

दहावी बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन पध्दतीनेच….नियोजित वेळेतच..!

मित्रहो कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळांचे आणि विद्यार्थ्यांचे भलतेच हाल झाले आहे. सध्या सोशल मीडियावर शाळेसबंधी खूपशा बातम्या कानावर पडत आहेत, त्यातीलच एक ताजी बातमी वाचली जात आहे. ही बातमी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दहावी आणि बारावीचे पेपर कधी व कसे होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती, शिवाय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपापली मते सुद्धा सांगितली होती. मात्र आता सरकारने यावर आपला ठाम निर्णय जाहीर केला आहे.

मंडळाकडून शनिवारी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आज सरकारने संमती दिली आहे. आता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये अशी सूचना सरकारने दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अगदी व्यवस्थित आकलन करून नियोजन करण्यात आले आहे. आता यामध्ये जर पुन्हा बदल केला तर बरोबर मांडलेली सर्व गणिते बिघडतील व कोणत्याच गोष्टींचा ताळमेळ राहणार नाही.

दहावी आणि बारावीच्या या परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळेतच होणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ही नियोजत वेळ आता अखेरचीच, या नुसारच परीक्षा घेतली जाईल. यासंदर्भात गुरुवारी सकाळी ११ वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद बसवण्यात आली, यामध्ये परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचे जाहीर केले जाणार असून यामध्ये आता कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील आठवड्यात दहावी बारावीची लेखी परीक्षा आणि त्याचे नियोजन एप्रिलमध्ये करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लॉकडाऊन कित्येक दिवस शाळा बंद होत्या, त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. तसेच जे ऑनलाइन शिक्षण आहे त्यापासून सुद्धा अनेकजण वंचित राहिले आहेत. असा दावा करत बच्चू कडू यांनी परीक्षेच्या नियोजनात काहीसा बदल करावा अशी सूचना दिली होती.

बच्चू कडू यांच्या या दाव्यानुसार मंडळाने शनिवारी हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला. यावर विचारपूर्वक सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला असून, मंडळाच्या प्रस्तावाला समंती मिळाली आहे. आता सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागायला हवेत. परिस्थिती लक्षात घेता आपण जास्त अभ्यास करून चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना आमच्याकडून खूप शुभेच्छा. आमचा आजचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Comments are closed.