Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…काबुलमध्ये हिजाब घातलेली दिसली CNN वार्ताहर, आणि म्हणाली तालिबानी आहेत खूप मैत्रीपूर्ण

काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही आपली शैली बदलावी लागली. अमेरिकन मीडिया हाऊस CNN च्या हिजाब घातलेल्या महिला रिपोर्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. CNN च्या चीफ इंटरनॅशनल रिपोर्टर क्लेरिसा वार्डने मंगळवारी हिजाब परिधान करत वृत्त दिले.

तालिबान्यांचा दृष्टीकोण मैत्रीपूर्ण

या दरम्यान क्लेरिसा यांनी सांगितले की, एकीकडे तालिबानी ‘अमेरिका मुडदाबाद’चा नारा देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचा दृष्टिकोन अतिशय मैत्रीपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.’

फोटो सोशल मीडियावर होत आहे वायरल

क्लेरिसाने हिजाब परिधान केलेली फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी ती हिजाब घालत नव्हती असे सांगण्यात येत आहे. मात्र, आता अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्ज्या नंतर तिचा पोशाख बदलला आहे. क्लेरिसाच्या रिपोर्टिंगच्या व्हिडिओमध्ये ती डोक्यापासून पायापर्यंत बुरख्यामध्ये दिसत आहे. क्लेरिसाच्या मागे तालिबानी सदस्य दिसत आहेत.

15 ऑगस्टच्या एका रिपोर्टिंगच्या विडिओमध्ये ती कुर्ता आणि दुपट्टामध्ये दिसली होती, परंतु 16 ऑगस्ट रोजी तिने हिजाब परिधान करून रिपोर्टिंग करताना दिसली.

तालिबानने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

दरम्यान, तालिबानने महिला आणि मुली शरिया कायद्याच्या अंतर्गत राहून काम करू शकतील आणि शिक्षणही घेऊ शकतील असे जाहीर केले आहे.

Comments are closed.