Take a fresh look at your lifestyle.

तालिबान आता काश्मीर जिंकून पाकिस्तानला देईल, ‘या’ पक्षाच्या नेत्याने केला खळबळजनक दावा; पहा विडिओ

इस्लामाबाद: तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाकिस्तानने सार्वजनिकरित्या तालिबानचे समर्थन करणे सुरू केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफ सुद्धा तालिबान्यांचा विजय साजरा करत आहे. दरम्यान, पीटीआयच्या एका नेत्याने काश्मीर प्रश्नाबाबत खळबळजनक दावा केला आहे. नीलम इर्शाद शेख म्हणाल्या की, “तालिबान पाकिस्तानसोबत आहे. तालिबान येऊन काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील.”

तालिबान पाकिस्तान सोबत आहे…

इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफच्या सदस्या नीलम इर्शाद शेख यांनी पाकिस्तानच्या ‘बोल टीव्ही’ वरील चर्चे दरम्यान हे वादग्रस्त विधान केले. तसेच तालिबानचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी घनिष्ठ संबंध आहेत, असे फार पूर्वीपासून मानले जात आहे.

नीलम इर्शाद शेख म्हणाल्या, “इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानचा मान वाढला आहे. तालिबान सुद्धा पाकिस्तानसोबत असल्याचे सांगतो आणि इंशा अल्लाह ते कश्मीर जिंकून आपल्याला देतील.”

भारताने आमचे तुकडे केले आम्ही पुन्हा एका होऊ…

अँकरने त्यांना विचारले की तालिबान काश्मीर जिंकून देईल, हे तुम्हाला कोणी सांगितले. यावर नीलम म्हणाली, “भारताने आपले तुकडे केले आहेत आणि आम्ही पुन्हा एक होऊ. आपल्या सैन्याकडे ताकत आहे, सरकारकडे शक्ती आहे. तालिबानसुद्धा  आम्हाला पाठिंबा देत आहे कारण त्यांच्यावर अत्याचार होत असताना पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला होता. आता तालिबान आम्हाला साथ देईल.”

पाकिस्तानी सैन्याने आणि आयएसआयने केली तालिबानला मदत

नीलमचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांना उघडपणे मदत केल्याचा आरोप होत आहे. अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान पाकिस्तानच्या आदिवासी भागातून हजारो दहशतवादी अफगाणिस्तानात गेले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट आली आहे.

इम्रान खान यांनी तालिबानला सामान्य नागरिक म्हणून संबोधले

याआधी इम्रान खान यांनीही तालिबानी लढाऊंना सामान्य नागरिक म्हणून संबोधले होते. ते म्हणाले होते, ‘अफगाणिस्तानमध्ये रक्ताची होळी खेळणारे तालिबान दहशतवादी नाहीत, ते सामान्य नागरिक आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानात सर्वकाही उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानमध्ये 30 लाख निर्वासित राहतात आणि पाकिस्तान त्यांच्यावर कारवाई कशी काय करू शकतो. ते म्हणाले की यातील बहुतेक निर्वासित पश्तून आहेत. हा तोच वांशिक गट आहे जो अफगाणिस्तानमध्ये लढत आहे.

इथे पहा तो वादग्रस्त विडिओ

यावर आपली प्रतिक्रिया जाणून घेणे आवडेल, तुम्हाला काय वाटते तालिबान खरच कश्मीर जिंकून पाकिस्तानला परत देईल का?

Comments are closed.