Take a fresh look at your lifestyle.

तालिबानने महिला आरोग्य कर्मचार्‍यांना बोलावले कामावर, जाणून घ्या सविस्तर माहिती

काबुल: तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून देशभरात रक्तपात सुरू आहे. त्यामुळे देशात आरोग्य विषयक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, तालिबानने शुक्रवारी देशातील सार्वजनिक आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले.

महिलांसोबत घृणास्पद वागणूक करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबानने अलीकडेच उदारमतवादी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  देशाचे नवीन सरकार (तालिबान सरकार) इस्लामी कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करेल आणि महिलांना काम करण्याची व शिक्षण घेण्याची परवानगी देईल.  त्यांनी पुन्हा एकदा ही बाब बोलून दाखवली.

मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. ही बाब महिलांच्या स्वातंत्र्यापेक्षा आरोग्य संकटांशी अधिक संबंधित आहे. अफगाणिस्तान वर आरोग्य संकट आल्यामुळे त्यांना महिला कर्मचार्‍याची आठवण झाली असल्याच अंदाज आहे.

तालिबानचे प्रवक्ते डॉ एम नईम यांनी केले आवाहन

तालिबानचे  प्रवक्ते डॉ एम. नईम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विटर वर ट्विट केले, ज्यात लिहिले होते की,  “इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तानच्या (IEA) सार्वजनिक आरोग्य विभागातील  सर्व महिला कर्मचाऱ्यांना राजधानी आणि इतर प्रांतांमध्ये नियमितपणे त्यांच्या कर्तव्यावर उपस्थित राहण्यासाठी सूचित केले जाते. त्यांच्या कामावर परत येताना इस्लामिक अमीरातकडून कोणतीही अडचण किंवा अडथळा नाही. ”

आरोग्य व्यवस्था आली मोडकळीस 

अफगाणिस्तानमधील हिंसाचारग्रस्त भागातील आरोग्य सुविधा वेगाने संपत आहेत आणि लवकरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेला सामोरे जावे लागू शकते.

गुरुवारी दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी काबूल विमानतळाबाहेर गर्दीमध्ये बॉम्बस्फोट घडवला. ज्यामध्ये शेकडो अफगाणी नागरिकांसह 13 अमेरिकन सैनिक मारले गेले. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक तालिबानी लढाऊ देखील ठार झाले.

Comments are closed.