मित्रहो हल्ली अनेक नवनवीन कथानक आपल्या भेटीस येत आहेत, त्यामुळे रसिक मंडळी या नवीन कथानकाला भेटण्यासाठी फार उत्सुक असतात. नुकताच झी मराठी वरील एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये आपला मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा भेटीस येत आहे. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे सर्व चाहते भलतेच उत्सुक आहेत. शिवाय हा रिलीज झालेला प्रोमो रसिकांची आतुरता खूप वाढवत आहे.
हे नवीन कथानक काय असेल याची अनेकांना उत्सुकता आहे, शिवाय यामध्ये आणखी एक उत्सुकतेची बाब म्हणजे स्वप्नील सोबत मालिकेत झळकणारी अभिनेत्री कोण?….. प्रोमो मध्ये स्वप्नील आणि त्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मास्क पाहायला मिळतो, त्यामुळे तिचा चेहरा आपणाला स्पष्ट दिसून येत नाही. पण मित्रहो यामध्ये जी अभिनेत्री आपल्या भेटीस येत आहे ती आहे शिल्पा तुळसकर. तिचे सर्व चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी भलतेच उत्सुक आहेत.
शिल्पा हीने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आपण पुन्हा एकदा २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले होते. ती यापूर्वी आपणाला “तुला पाहते रे” या मालिकेत दिसून आली होती, यामध्ये देखील तिचा अभिनय अनेकांना खूप आवडला होता. शिवाय तिला लोकप्रियता सुद्धा भरपूर मिळाली होती. आता पुन्हा एकदा शिल्पा आपल्या समोर एक नवी भूमिका साकारणार आहे..
तसेच २०१९ मध्ये ” भेटी लागे जिवा” या मालिकेतून स्वप्नील जोशी प्रेक्षकांच्या भेटीस छोट्या पडद्यावर आला होता. त्याची ही मालिका आजही रसिकांची प्रिय असून, मराठी चित्रपट सृष्टतील हा चॉकलेट बॉय नक्कीच या मालिकेतून सुद्धा आणखीन प्रिय होईल. आजवर त्याचे अनेक वेबसिरीज, आणि चित्रपट आपणाला पाहायला मिळाले आहेत. शिवाय त्याने मालिकेत सुद्धा काम केले आहे.
स्वप्नील आणि शिल्पाला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी रसिक मंडळी प्रचंड उत्सुक आहेत, शिवाय नव्या कथानकेत त्यांची नवी भूमिका कशी मनोरंजन करेल हे पाहणे सुद्धा तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. या नव्या जोडीला नक्कीच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. तर मित्रहो तुम्हाला त्यांची जोडी, आणि मालिकेचा पहिला प्रोमो कसा वाटला ते नक्की सांगा. तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.
Comments are closed.