रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याचे मोल सांगणारा दिवस. कितीही दूर असलेला भाऊ , बहीण आज मात्र आपुलकीने एकत्र येतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधतात. परंतु श्वेता सिंह कीर्ती मात्र आपल्या भावाला आठवून दुःखी झाली. सुशांतसिंग राजपूत हा श्वेता चा भाऊ, दोघेही प्रत्येक रक्षाबंधन ला एकत्र असायचे. यावेळी मात्र तसे घडलले नाही. श्वेता ने सुशांत बरोबरचा एक फोटो सोशल साईटवर शेअर करून आठवणींना उजाळा दिला.
View this post on Instagram
मागील वर्षीसुद्धा रक्षाबंधन सणाच्या दिवशी श्वेताने तिचा भाऊ सुशांतसोबतचे लहानपणीचे फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मागील वर्षी पहिल्यांदाचा शुशांत शिवाय त्यांना रक्षाबंधन साजरा करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी जुन्या फोटो शेअर केल्या होत्या.
View this post on Instagram
एक चांगला कलाकार
सुशांतसिंग राजपूत हे बॉलिवूड मधील चर्चित असे नाव होते. काही सिरीयल मध्ये काम केल्यानंतर ‘काय पो चे’ या सिनेमाद्वारे त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, सोनचिरीया, चिचोरे यासारखे सिनेमे केले. दिल बेचारा हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.
प्रेयसीवर झाला होता आरोप
सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली . त्याच्या आत्महत्या करण्याने सर्वत्र खळबळ माजली होती. शेवटपर्यंत मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि त्यानंतर NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी केली गेली होती.
या प्रकरणात रिया चक्रवर्ती वर संशय निर्माण झाला होता. बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप ट्रोल झाली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. रियाला आणि तिच्या कुटुंबालाही फार ट्रोल केले गेले. त्यानंतर बऱ्याच बॉलिवूड मधील लोकांची चौकशी केली गेली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही. सुशांतची हत्या केली गेलीय अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु पुराव्या अभावी ते सिद्ध करता आले नाही.
Comments are closed.