Take a fresh look at your lifestyle.

सोनपेठ तालुक्यातील डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते संपन्न

पाथरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध! सोनपेठ तालुक्यातील अनेक डांबरीकरण रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम या विभागांतर्गत राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. आज सोनपेठ तालुक्यातील या डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन आमदार सुरेश वरपुडकर हस्ते यांच्या करण्यात आले. यावेळी संतोष सावंत, अ‍ॅड.हनुमंत जाधव पोहंडुळकर, डॉ.मुंजाभाऊ धोंडगे, पप्पू मोकाशे, जगन्नाथ कोलते, अमोल बचाटे, सुदर्शन कदम, बाळासाहेब हरगुडे, प्रकाश बचाटे, राजाभाऊ सावंत, पंडितराव सावंत, राजाभाऊ मुंढे, शेख तय्यब, राजू सौदागर उपस्थित होते.

पाथरी विधानसभा मतदार संघातील अनेक डांबरीकरण रस्त्यांना राज्यसरकार कडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. त्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील वंदन डांबरीकरण रस्त्यासाठी 1 कोटी 29 लक्ष रुपये, बुक्तरवाडी डांबरीकरण रस्त्यासाठी 82 लक्ष रुपये, पारधवाडी रस्त्यासाठी 1 कोटी 8 लक्ष रुपये, नैकोटा रस्त्यासाठी 3 कोटी 74 लक्ष रुपये, चुकार पिंपरी डांबरीकरण रस्त्यासाठी 77 लक्ष रुपये, गवळी पिंपरी रस्त्यासाठी 70 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच परभणी तालुक्यातील तरोडा येथील डांबरीकरण रस्त्यांचे देखील भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.

पाथरी विधानसभा मतदार संघातील चारही तालुक्यातील अनेक रस्त्यांना यावेळी निधी प्राप्त झाला असून उर्वरित रस्त्यांना पुढील काळात निधी प्राप्त होऊन त्या रस्त्यांची कामेही मार्गी लावण्यात येतील. तसेच रस्त्यांव्यतिरिक्त इतर विकास कामासाठी देखील निधी कमी पडू न देता पाथरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार सुरेश वरपुडकर यांनी व्यक्त केले.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका