Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…’या’ कांडामूळे भाजप, कॉंग्रेससहित या 8 पक्षांवर सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला 5 लाखांचा दंड

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेपासून लपवल्याबद्दल दंड ठोठावला आहे. बिहार निवडणुकीदरम्यान उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड माध्यमांमध्ये प्रकाशित न करण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आदेशाचे पालन न करता न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आठ पक्षांना दोषी ठरवले.

न्यायालयाने सीपीएम आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या आदेशाकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याबद्दल त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर जेडीयू, आरजेडी, एलजेपी, काँग्रेस, बसपा, सीपीआय यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाचे योग्य प्रकारे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाला दिले निर्देश

मतदानापूर्वी उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सार्वजनिक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तीन महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी हे आदेश लागू होतील. न्यायालयाने निवडणूक आयोगाला एक मोबाईल अॅप बनवण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती असेल. त्यात प्रत्येक उमेदवाराविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत, कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याची स्थिती काय आहे याबद्दल माहिती असेल.

न्यायालयाने म्हटले की, अॅप असे असले पाहिजे की सर्व नेत्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास सांगितले आहे. सामान्य लोकांच्या तक्रारी घेणे आणि त्यांचे निराकरण करणे हे या विभागाचे काम असेल. जर कोणत्याही उमेदवाराने आपली माहिती लपवली तर या विभागात तक्रार नोंदवली जाईल.

Comments are closed.