Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ सत्य समोर आले नसते तर अमृता सिंगने केले असते सनी देओल सोबत लग्न, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई: अभिनेत्री अमृता सिंहने 80 च्या दशकात आपल्या जबरदस्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत छाप सोडली होती. अमृताला तिच्या पहिल्याच चित्रपटातून भरघोस यश मिळाले होते. तिचा पहिला चित्रपट ज्यात सन्नी देओल मुख्य भूमिकेत होता, फार चालला होता. पहिल्या चित्रपटातील यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने त्यानंतर अनेक हिट चित्रपटात काम केले. अमृता जितकी तिच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध झाली, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्ध झाली होती. आपल्यापेक्षा वयाने लहान सैफ अली खानसोबत लग्न केल्यावर ती खूप चर्चेत होती.

धर्मेंद्र त्यांचा मुलगा सन्नी देओलला लॉंच करण्यासाठी ‘बेताब’ चित्रपट बनवत होता. धर्मेंद्र सन्नीसोबत काम करण्यासाठी नव्या चेहर्‍याचा शोध घेत होते. ऑडीशन दरम्यान धर्मेंद्रला अमृता सिंग आवडली. असे म्हटले जाते की, या चित्रपटासाठी मिनाक्षी शेषाद्री आणि मंदाकिनी या अभिनेत्रींनी सुद्धा ऑडीशन दिले होते. मात्र, धर्मेंद्रला अमृता सिंगचा साधे पणा आणि चेहर्‍यावरील निरागसपणा आवडला होता. सन्नी देओल आणि अमृता सिंग यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ रिलीज होताच सुपरहिट झाला.

सन्नी-अमृताची जोडी रुपेरी पडद्यावर इतकी जबरदस्त हिट झाली की दोघेही रातोरात स्टार बनले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सन्नी देओल आणि अमृता सिंग मध्ये जवळीकता निर्माण झाली होती, असं सांगण्यात येते.

सन्नी देओलच्या आयुष्यातील काही सत्य तिला माहिती नव्हते

अमृता सिंग आणि सन्नी देओल या सुपरहिट जोडीने दुसऱ्या एका चित्रपटात एकत्र काम केले आणि त्या दरम्यान त्यांचे प्रेम आणखी फुलले. अमृताने सन्नीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगण्यात येते. पण अमृताला त्याच्याविषयी पूर्ण माहिती नव्हती आणि जेव्हा तिला त्याचे सत्य समजले, तेव्हा तिने पाहिलेले स्वप्न धुळीस मिळाले.

सन्नी देओलचे सत्य ऐकून अमृताचे हृदय तुटले

सन्नी देओलच्या चित्रपटसृष्टीमधील कारकीर्दीवर काही परिणाम होऊ नये म्हणून धर्मेंद्रने सन्नीचे खाजगी आयुष्य सर्वांपासून लपवले होते. तसेच सन्नीलाही ते सत्य कोणालाही सांगण्यास मनाई होती.

असे म्हटले जाते की सन्नी आधीच विवाहित होता आणि धर्मेंद्रला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी हे सत्य उघड करायचे नव्हते. जेव्हा अमृता आणि सन्नीच्या अफेअरच्या बातम्या झपाट्याने पसरू लागल्या, तेव्हा अमृता सिंगची आई दोघांच्या मध्ये येऊ लागली. अमृताच्या आईला हे नाते आवडले नव्हते. अमृता सन्नीसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम असताना, तिच्या आईने सन्नी हा विवाहित असल्याचे तिला सांगितले. हे ऐकून अमृताचे हृदय तुटले आणि तिला फार दुःखझाले. यानंतर अमृताने स्वतःला सन्नीपासून दूर केले.

Comments are closed.