Take a fresh look at your lifestyle.

‘ट्वेंटीवन शुगर’च्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुकाणू समिती झाली आक्रमक

सोनपेठ : ट्वेंटीवन शुगरच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.25) दुपारी कारखान्याच्या आवारात ठिय्या मांडला. सोनपेठ तालुक्यातील एकमेव खाजगी साखर कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामाच्या थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुकाणु समितीच्या विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याच्या मुख्य ईमारतीत ठिय्या मांडून जोरदार आंदोलन करण्यात आले.

सुरुवातीला कारखान्याच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या शेतकऱ्यांना दोन तास बसुनही कारखाना प्रशासनाच्या वतीने कुठलीही विचार पुस न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यात शिरुन सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले व कारखाना बंद केला व तेथील मुख्य गेटवर ठिय्या मांडला. गेल्या हंगामातील प्रती टन ५०० रुपये थकीत बिल जमा केल्या शिवाय शेतकऱ्यांनी उठणार नसल्याचे घोषित केले.
परीस्थिती गंभीर व तणावपूर्ण होताच सोनपेठ येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासना सोबत मध्यस्थी सुरु केली.

शेतकऱ्यांनी लेखी ठोस आश्वासन मिळेपर्यंत कारखाना सोडणार नसल्याचे जाहीर केले. या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सुधीर बिंदु, गणेश पाटील, विश्वंभर गोरवे,भारतीय जनता पार्टीचे सुशील रेवडकर , माऊली जोगदंड, सोमनाथ नागुरे,रामेश्वर मोकाशे,,परमेश्वर वाघ,मदनराव वाघ,रमेशराव मोकाशे, नंदकुमार जोगदंड,नवनाथ वाघ कपिल धुमाळ, राधाकिशन सुरवसे, दिपक बिडगर,रामभाऊ  सुर्यवंशी,ज्ञानोबा वाघ,माधव लांडगे,मदन बल्लाळ, कृष्णा बल्लाळ,शिवाजी सोनवणे,रावसाहेब मोरे ,शिवसांब लोखंडे, सुर्यभान कोपणर यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हाभरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.कारखान्याच्या वतीने यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भारुड,अभंग,गवळणी म्हणुन कारखानदाराकडे थकीत ऊस बिल मागितले.

Comments are closed.