Take a fresh look at your lifestyle.

अबब…सेलूचे बसस्टॅन्ड खड्ड्यात !

सेलू  :- सेलू शहरातील मध्यवस्तीत बीओटी तत्त्वावर सुसज्ज असे बसस्टॅन्ड बांधण्यात आले आहे. मात्र सध्या या बसस्टॅन्ड परिसरात प्रचंड मोठमोठे खड्डे झाले आहेत की अक्षरशः खड्ड्यातच बसस्टॅन्ड उभारले आहे की काय असे चित्र दिसत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस पडल्यानंतर बसस्टॅन्डमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडतांना या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने बसस्टॅंडच्या सभोवताली सर्वत्र पाणी साचलेले असते. अशा परिस्थितीत बसस्टॅन्डमध्ये जायचे म्हणजे अक्षरशः जंजिरा किल्ल्यावर गेल्या प्रमाने कसरत करावी लागते. बस चालकासही रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यात बस घातल्याशिवाय पर्याय नाही.

या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी दोघेही वैतागले आहेत. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे खड्डे बुजविण्याला मात्र मुहूर्त लागत नाही. अशा खड्डेमय रस्त्यावरून दिवसभरात शेकडो बसेस ये-जा करतात. वृद्ध आणि आजारी प्रवाशांना या खड्ड्याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्या प्रमाणे शहरातील सामाजिक प्रश्न सोडविणाऱ्या संघटनाचेही या खड्ड्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. फूटभर खोल आणि आठ- दहा फूट लांबीचे खड्डे या दोन्ही रस्त्यावर परिसरात पडले आहेत. संबंधित विभागाच्या अधिका-यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अशी सेलूकरांची मागणी आहे.

पुर्ण…. डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.