Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण

परभणी/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कृती समिती परभणी विभागातर्फे एसटी कर्मचा – यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्याच्या पुर्ततेसाठी विभागीय कार्यालय गंगाखेड रोड परभणी येथे बुधवारी (दि.27) सकाळी 11 वाजता उपोषण सुरु करण्यात आले. वार्षीक वेतन वाढीचा दर २ टक्के ऐवजी ३ टक्के करावा. शासकिय कर्मचा – या प्रमाणे महागाई भत्ता २८ टक्के देण्यात यावा.

घरभाडे भत्ता ७ , १४ , २१ ऐवजी ८ , १६ , २४ टक्के प्रमाणे त्वरीत देण्यात यावा. दिवाळीपुर्वी रुपये १५ हजार रुपये बोनस त्वरित देण्यात यावा. शासकिय कर्मचा – या प्रमाणे सण अग्रिम उचल रु . १२ हजार ५०० रुपये देण्यात यावा. महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वार्षिक वेतन वाढीच्या दराची थकबाकी एक रक्कमी दिवाळीपुर्वी देण्यात यावे. सर्व संघटना पदाधिका – यांनी निवेदन दिले व उपोषणामध्ये सहभाग नोंदविला.

यावेळी श्री.मनोहर गावंडे , श्री गोविंदराव वैद्य , श्री . शामराव खेत्री श्री बालाजी भूजबळ , श्री . देविदास दामोधरे , श्री . संतोष पालकुर्तावार , श्री.संतोष हारकळ , श्री . दिगांबरराव दराडे , श्री . देविदासराव जटाळे , श्री . संदिप बोराडे , श्री . विजय पुरी , श्री . आकाश मुळे , श्री . अनिल घोडके , श्री महेंद्र बनसोडे , श्री . विजय सुर्यवंशी तसेच परभणी विभागातील सर्व संघटनेचे विभागीय पातळीवरील पदाधिका – यांनी उपोषणामध्ये स्वयंमस्पुर्तीने सहभाग नोंदविला, असे महाराष्ट्र राज्य परिवहन संयुक्त कृती समिती, परभणी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Comments are closed.