Take a fresh look at your lifestyle.

पुरात ट्रॅक्टरसह 5 माणसे गेली वाहून; अंधारात शर्थीचे प्रयत्न करून वाचवले प्राण, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील घटना

परभणी : फाल्गुनी नदीला पूर आलेला असताना याच पाण्यातून ट्रॅक्टर काढण्याच्या ट्रॅक्टरचालकाक्या प्रयत्नांत वाहनासह 5 व्यक्ती वाहून गेल्याची घटना रविवारी (दि.17) रात्री सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली. नदीत ट्रॅक्टरसह वाहून गेलेल्या पाच जणांचे प्राण वाचविण्यात शेळगाव येथील गावकऱ्यांना मोठ्या प्रयत्नानंतर यश आल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला.

ट्रॅक्टरचालकाच्या अतिउत्साहीपणामुळं पाच जणांचे जीव टांगणीला लागले होते . मात्र शेळगावच्या नागरिकांनी अंधार असतानाही जीवाची बाजी लावून या पाच जणांचे प्राण वाचवले. सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठला जोडणाऱ्या शेळगाव -उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीला सकाळपासुनच पूर आला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतुक सकाळपासूनच बंद होती. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेळगावहून उक्कडगावकडे एक ट्रॅक्टर जात असताना शेळगावच्या काही नागरिकांनी त्यांना पाणी वाढले असल्याने न जाण्याची सुचना केली तरी ही ट्रॅक्टर चालकाने जाण्याचे ठरवले.

थडी पिंपळगाव येथील दोन जण आपल्या दुचाकीवर गावाकडे जाण्याची वाट बघत बसलेले होते ते ही या ट्रॅक्टरमध्ये आपल्या दुचाकी वाहनासह बसले. या ट्रॅक्टरमध्ये एकूण पाच जण बसले होते. यात दिपक गुलाब कदम (वय 27 वर्षे) , बाबासाहेब सुभाष कदम (वय 32 दोघे रा.थडीपिंपळगाव), गोट्या राजेभाऊ कांबळे (वय 45 रा . शेळगांव), रामा धुराजी उफाडे (वय 43 रा गंगापिंपरी) , शिवाजी बबन आडे (वय 42 रा. शेळगांव तांडा) यांना वाचवण्यात आले. या बचाव मोहिमेत शेळगावकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन वाहुन गेलेल्या व्यक्तींचे जीव वाचवले.

Video :

Comments are closed.