Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… रिकाम्या पोटी फळे खाणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या सविस्तर माहिती

फळांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे अनेक विविध पोषक पदार्थ असतात. त्यामुळे डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. आहारात योग्य पद्धतीने फळे घेतल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. बर्‍याचवेळा लोक रिकाम्यापोटी फळांचे सेवन करतात. विशेषतः उपवासाच्या दिवशी रिकाम्यापोटी फळे खाण्याचे प्रमाण जास्त असते. पण जे फळे आपण स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खातो, परंतु  ते आपल्यासाठी हानीकारक ठरू शकतात. हो तुम्ही बरोबरच वाचलय. रिकाम्यापोटी फळे खाणे हानिकारक ठरू शकते.

जठरासंबंधी समस्या होऊ शकतात

फळांचे सेवन, विशेषत: आंबट फळे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत, कारण रिक्त पोटी आंबट फळे खाल्ल्याने जठराची समस्या उद्भवू शकते. यामुळे डोकेदुखी, पोटदुखी, अपचन, आंबट ढेकर आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.

पोटात सुज येऊ शकते

रिकाम्या पोटी फळांचे सेवन केल्याने पोटात सूज येऊ शकते. यामुळे, पोट जास्त भरल्यासारखे जाणवू लागते. तसेक यामुळे पोट फुगण्याची समस्या देखील होऊ शकते.

पचनसंस्थेत बिघाड होऊ शकते

काही लोक वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करतात, जे योग्य नाही. रिकाम्या पोटावर नाशपाती, आंबा, लिची सारख्या फळांचे सेवन केल्याने पोटातील नाजूक पडद्यावर परिणाम होतो, ज्यामुळे पचनसंस्थेत समस्या निर्माण होतात.

रक्तातील शुगर लेवल वाढू शकते

रिकाम्या पोटी फळांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेहाचा धोकाही लक्षणीयरित्या वाढतो.

अस्वस्थ वाटू शकते

अशी अनेक फळे आहेत ज्यांचे रिकाम्या पोटावर सेवन केल्याने अस्वस्थता, उलट्या, हृदयाची धडधड आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, रिकाम्या पोटावर संत्री, द्राक्षे, आंबा, लिची, केळी आणि नाशपाती यासारख्या फळांचे सेवन टाळावे.

(टीप: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही. कृपया वरील गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

Comments are closed.