Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…सिद्धार्थ शुक्लाच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा, म्हणाले अशाप्रकारे सिद्धार्थचा मृत्यू होऊ शकत नाही

मुंबई: दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर आता त्यांचे जिम ट्रेनर सोनू चौरसिया यांचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे. एक हिन्दी वृत्त वाहिनीशी बोलताना सोनू चौरसिया म्हणाले, “सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असेल, यावर माझा विश्वास बसत नाही . तो खूप तंदुरुस्त होता आणि फिटनेसबाबत खूप जागरूक होता. मी गेल्या दीड वर्षांपासून सिद्धार्थला जिममध्ये प्रशिक्षण देत होतो. दररोज सकाळी 10.30 वाजता आम्ही जिममध्ये भेटायचो. तो जिममध्ये खूप मेहनत करायचा.”

ते कधीच मानसिक तणावात किंवा नैराश्यात नव्हते…

ते पुढे म्हणाले, ‘मला राहुल वैद्य यांचा सकाळी 9.30 वाजता फोन आला होता. त्यांनी मला सिद्धार्थ आजारी असल्याचे सांगितले . सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, पण नंतर अनेक कॉल येऊ लागले. सिद्धार्थचा मृत्यूबद्दल  ऐकून मला पूर्णपणे धक्का बसला आहे. सिद्धार्थ कधीही कोणत्याही मानसिक तणावाखाली किंवा नैराश्यात गेला नाही. तो नेहमी आनंदी आणि लोकांना आनंदी ठेवणारा व्यक्ती होता.”

जिम मध्ये खूप मेहनत करायचे …

“24 ऑगस्ट रोजी माझे सिद्धार्थशी  बोलणे झाले होते. त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या कारण मी त्यादिवशी मुंबईत नव्हतो. 20 ऑगस्ट रोजी त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला कार भेट देण्याविषयी बोलले होते आणि 22 ऑगस्टला ती भेटही दिली. सिद्धार्थ जिम मध्ये नेहमी खुश राहायचा तसेच खूप मेहनत करायचा.” असेही त्यांच्या जिम ट्रेनरने सांगितले.

पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहे 

सोनू चौरसिया पुढे म्हणाले, ” सिद्धार्थ रात्रीच्या जेवणानंतर 40 मिनिटे चालत असे. काल रात्री 11.30 च्या सुमारास मीटिंगमधून परत आला होता . त्या मिटिंग मध्येच त्यांनी जेवण केले होते, त्यामुळे रात्री घरी फक्त ताक आणि फळे खाल्ली. त्यानंतर उशिरा रात्री 1.30 च्या सुमारास सिद्धार्थ झोपायला गेला.  मात्र, सकाळी त्याची आई जेव्हा त्याला उठवण्यास गेली होती, तेव्हा तो उताणा झोपला होता. परंतु, तो कधीच असे झोपत नव्हता.  लगेच डॉक्टरला बोलवण्यात आले. त्याला तिथे CPR देण्यात आला. परंतु, काहीच प्रतिक्रिया मिळत नसल्याने त्याला ऍम्ब्युलन्स ने दवाखान्यात नेण्यात आले. परंतु दवाखान्यात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.”

“मी सध्या त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची  वाट पाहत असून, मला वाटत नाही त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असेल.” असेही ते म्हणाले.

सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित मृत्यूमुळे बॉलीवूड ते टीव्ही इंडस्ट्री मधील सर्वजण हालहाल व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आणि त्याच्या मृत्याबद्दल हळहळ  व्यक्त केली.

Comments are closed.