सेलू :- मातृहृदयी साने गुरुजींच्या अजरामर, ‘श्यामची आई’ साहित्यकृतीद्वारे पिढ्या दर पिढ्यात एका शाश्वत संस्काराची रुजवणुक होत आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक तथा नूतन शाळेचे उपमुख्याध्यापक संतोष पाटील यांनी येथे केले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे, शिक्षकांसाठी आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची, परभणी जिल्हास्तरीय स्पर्धा शनिवारी (२९ जानेवारी) झाली. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. पर्यवेक्षक के.के.देशपांडे, परीक्षक महादेव आगजाळ, दिगंबर रोकडे, अनुष्का हिवाळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री देशपांडे यांनी ‘कथाकथन-तंत्र आणि मंत्र’ या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्पर्धेत, फारुकी महंमद सगीर (न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, सेलू) यांनी प्रथम; द्वितीय भगवान पावडे (जिजामाता बाल विद्या मंदिर), तर तृतीय पारितोषिक प्राप्त भगवान पल्लेवाड ( शांताबाई नखाते आश्रमशाळा, वालूर) यांना प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. प्रणिता सोलापुरे, जिल्हा समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांच्यासह परीक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर, किशोर कटारे, सुरेश हिवाळे, केशव डहाळे, अरुण रामपूरकर आदींनी परिश्रम घेतले.
डाॅ विलास मोरे, सेलू.
Comments are closed.