Take a fresh look at your lifestyle.

‘करिअर कट्टा’ मध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनंत संधी – श्री शितोळे

परभणी : करिअर कट्टा या राज्य पातळीवरील ऑनलाइन उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी , उद्योजक यासारख्या आणि इतर वेगवेगळ्या करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायत्ता केंद्राचे अध्यक्ष, व करिअर कट्टा चे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री यशवंत शितोळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित ‘करिअर कट्टा’ परभणी जिल्हा प्राचार्य, समन्वयक, विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उद्घाटक तर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, प्रबंधक श्री विजय मोरे, महाविद्यालय आणि परभणी जिल्हा समन्वयक डॉ.रामानंद व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री शितोळे म्हणाले, ‘मोबाईलमुळे आभासी भिंती तयार झाल्या असून परिणामी आपली विचार करण्याची शक्ती हिरावून घेतली जात आहे . ऑनलाइनच्या जमान्यात विद्यार्थी करिअरच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. करियर कट्टा उपक्रमात युट्युब, टेलिग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाममात्र एक रुपया फिसमध्ये दररोज महाराष्ट्रातील ८५० सनदी अधिकारी आणि 3500 यशस्वी उद्योजक क्रमाक्रमाने मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायबर आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना ई-फायलिंग कोर्सेस मोफत सुरू केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे’
उदघाटकीय मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर म्हणाले, खूप प्रयत्न करूनही स्पर्धा परीक्षेत यश मिळू न शकल्याने विद्यार्थी आयुष्यात मात्र यशस्वी होताना दिसतात. स्वतःशी प्रामाणिक राहून यशाचा मार्ग तयार केल्यास कोणत्याही ठिकाणी यश मिळू शकते हेच यावरून सिद्ध होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून सकारात्मक आणि सृजनात्मक विचार मंथन होईल म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा मध्ये सहभागी व्हावे.
करियर कट्टाच्य माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा शोधाव्यात ,असे आवाहन अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले. सदरील मेळाव्यास जिल्ह्याभरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, समन्वयक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये काम करून श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शेख समीर या विद्यार्थ्याचे पालकत्व करिअर कट्टा घेत असल्याचे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे प्रमुख तसेच करिअर कट्टाचे राज्य प्रमुख श्री यशवंत शितोळे यांनी जाहीर केले. या विद्यार्थ्यांना करियर कट्टा अंतर्गत चे संपूर्ण प्रशिक्षण मोफत मिळणार आहे . समीर शेख यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी महाविद्यालय आणि परभणी जिल्हा समन्वयक डॉ.रामानंद व्यवहारे यांनी केले करिअर कट्टा चे ब्रँड अँबेसिडर असलेले योगेश कदम आणि गायत्री देशमुख यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन डॉ.तुकाराम फिसफिसे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.