काही दिवसांपासून देशभरात असो किव्हा साता समुद्र पार ‘पुष्पा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुष्पा या चित्रपटाचा खरा हक्कदार त्याचा हिंदीमधील आवाज आहे जो अल्लूला सर्वात उंच स्थानी जाऊन ठेवतो. आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मराठी व्हॉइस आर्टिस्ट संकेत म्हात्रे याचा आवाज देण्यात यायचा. पण यावेळी पुष्पा या चित्रपटासाठी विशेष आवाज हवा होता.
जो त्यांना हवा तसाच मिळाला. हिंदीमधील पुष्पा चित्रपटासाठी देण्यात आलेला आवाज मराठी आणि हिंदी अभिनेता श्रेयस तळपदे यांचा आहे. पुष्पा या चित्रपटासाठी मराठी तडका हवा होता! जो तडका श्रेयस तळपदे यांनी ‘काय भाऊ कसं काय..?, बरं आहे ना.? मस्त मस्त!’ असा दिला. श्रेयस तळपदे यांचा हा आवाज ऐकून डायरेक्टरला खूप आवडला त्यांनी लगेच विचारून कळवतो. असे म्हंटले. पुष्पा हा महाराष्ट्र आणि आंध्राच्या बॉर्डरवर राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ह्यात थोडा मराठी तडका हवाचं. जो त्यांनी ठेवला सुद्धा!
श्रेयस तळपदे एका इंटरव्ह्यूवेळी म्हणाले की, जेव्हा खिश्यात पैसे नसायचे तर कोण्ही सांगायचं डबिंग ट्राय कर. ऑडिशन देण्यासाठी जा… मग तिथे गेल्यानंतर काही डबिंग कॉर्डिनेटर असायचे. ते मित्राला विचारून कळवतो म्हणायचे. मग त्यावेळी सिलेक्ट झालो नाही खूप वाईट वाटलं. पण तेव्हा असं काहीच न्हवत की मी जिद्द केलीये की मी डबिंग आर्टिस्ट बनून दाखवेन.
साऊथ चित्रपटाचे डबिंग करण्यासाठी खूप सारे डबिंग आर्टिस्ट आपल्याकडे आहेत. मग यावेळी माझी निवड का करण्यात आली..? ते म्हणाले हिंदी चित्रपट म्हणून आम्हांला ही फिल्म रिलीज करायची आहे. याआधी श्रेयस तळपदे यांनी एक चित्रपट डब केला होता त्याचे नाव आहे ‘द लायन’ तो ही चित्रपट खूप चालला. पण त्यानंतर अचानक साऊथ चित्रपटासाठी आवाज विचारला. मी आजपर्यंत अशी भूमिका निभावली नाही आहे. अश्या भूमिकेला माझा आवाज देण्याची संधी भेटत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे . पण जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा मात्र मी आवक झालो.
ट्रेलरनंतर जो पॉसिटीव्हीटी रिस्पॉन्स येऊ लागला त्यानंतर जरा बरं वाटलं! असं श्रेयस तळपदे म्हणाले. श्रेयस तळपदे हे ही म्हणाले की काही वेळ लोटून गेल्यानंतर सुद्धा काही लोकांना अजून माहीत न्हवते की पुष्पा या चित्रपटात माझा आवाज देण्यात आला आहे. काही लोकांना विश्वास बसत न्हवता. पण या संधीचे सोने झाल्याचे दिसत आहे. पुष्पा २ ही आत्ता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे पण अद्याप या चित्रपटात हिंदी आवाज कोण देईल हे समजले नाही.
पण श्रेयस तळपदे म्हणाले की मला जर संधी मिळाली तर मी नक्की पुष्पा २ साठी आवाज देईन. प्रेक्षकांना हिंदी पुष्पा खूप आवडला आहे असं तो म्हणाला. तर तुम्हाला पुन्हा श्रेयस तळपदे यांचा आवाज ऐकायला आवडेल का..? कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
Comments are closed.