Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…अफगाणिस्तानची तुलना भारतासोबत केल्याने भडकल्या केंद्रीय मंत्री, ओवेसीवर केला जोरदार हमला

नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर भारतातही त्याचे राजकीय परिणाम दिसू येत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्या नंतर भारतात राजकीय शेरेबाजीला ऊत आला आहे. अनेक नेते भारतातील स्थितीशी तुलना अफगाणिस्तानमधील स्थितीशी करत आहेत.

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे भडकल्या

भारत आणि अफगाणिस्तानमधील परिस्थितीची तुलना केल्यामुळे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, ओवेसींना अफगाणिस्तानला पाठवणे चांगले राहील.

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री यांनी म्हटले, “ओवेसींना त्यांच्या महिला आणि समुदायाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानला पाठवणे चांगले राहील.”

मोदी सरकार अफगाणिस्तान मधील हिंदू आणि शीख समुदायातील लोकांना देणार आश्रय

मागील आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते की, भारत केवळ अफगाणिस्तानातील नागरिकांचे संरक्षणच करणार नाही, तर शीख आणि हिंदू समुदाय जे भारतात येऊ इच्छितात त्या अल्पसंख्याकांना आश्रय सुद्धा देण्यात  येईल.

काय म्हणाले होते ओवेसी?

ओवेसी म्हणाले होते, ‘एका अहवालानुसार, भारतातील प्रत्येक 9 पैकी एक मुलगी पाच वर्षांची होण्यापूर्वीच मरते. पण त्यांना (केंद्र सरकारला) अफगाणिस्तानात महिलांचे काय चालले आहे याची चिंता आहे. भारतातील स्थिति त्यांना दिसत नाही का?’

रविवारीच तालिबानने अफगाणिस्तानात आपला विजय घोषित केला होता. सुमारे दोन दशकांनंतर तालिबानच्या सत्तेत परत येण्याच्या भीतीने अनेक अफगाण नागरिक देश सोडून पळून जात आहेत.

भारताने ई-व्हिसा सेवा सुरू केली आहे

भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अफगाणांसाठी भारताने आपत्कालीन ई-व्हिसा सेवा सुरू केली आहे. अफगाणिस्तानातून e-विसा काढण्याच्या विनंत्यांना मदत करण्यासाठी 24×7 विशेष अफगाणिस्तान हेल्पलाईन सेल सुरू करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेण्यापूर्वी सुमारे 1650 भारतीयांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

धर्माच्या आधारावर सत्ता बनली तर अफगाणिस्तान सारखीच स्थिती भारतात निर्माण होईल

दरम्यान, विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीची तुलना भारतातील स्थितीशी केली आहे. अनेक नेत्यांनी असे म्हटले आहे की, जर एखाद्या धर्मातील कट्टरवादी संघटनांना अनुकूल वातावरण सरकार निर्माण करत असेल तर भारतातही अफगाणिस्तान सारखी परिस्थिती उद्भवू शकते. धर्माचच्या आधारावर जर सत्ता निरम्न करण्यात आली तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असेही बर्‍याच नेत्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.