Take a fresh look at your lifestyle.

“अमृता फडणवीस यांना सध्या काही काम नाही, भाजपने त्यांना पक्षाचे प्रवक्ते पद द्यावं”, मनीषा कायंदे यांचा टोला

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राजकीयदृष्ट्या नेहमी सक्रिय असतात. त्या राज्यसह देशातील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर नेहमी त्यांची भूमिका मांडत असतात. काल पुण्यात असताना अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

‘काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात.’ या शब्दात अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच पुण्यातील कोरोना पॉजिटिवीटी दर 4 पेक्षा कमी असतानाही पुण्यातील निर्बंध शिथिल का केले नाहीत? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. याबरोबरच कोरोना नियम पाळूनच नागरिकांनी शॉपिंग करावी, असं आवाहन ही त्यांनी केलं.

मनीषा कायंदे यांचं प्रत्युत्तर

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी त्यांना टोला लगावला. ‘आमचे लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी तिथेही राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतेही काम नसल्यामुळे भाजप पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी.’ असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर अमृता फडणवीस यांनी राज्यसरकार फुकट या कामाचे श्रेय घेत असल्याची टीका केली. त्या म्हणाल्या, ‘काम करतं एक आणि श्रेय घेण्यासाठी हार दुसरेच घालून जातात.’

Comments are closed.