Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांसमोरच झाला सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कारण ऐकून थक्क व्हाल

सांगली: मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये महापूर आला होता. यात मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे पूरग्रस्त भागाचे दौरे सुरू आहेत. सांगलीमधील कृष्ण नदीला आलेल्या महापुराची पाहणी करायला आज (02 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. यावेळी त्यांच्यासमोरच शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या महापुराची पाहणी करत असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे नाराज झालेले  शिवसेना कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांना भिडले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

आयर्विन पूलावरून कृष्ण नदीची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेठेत आले होते. त्याठिकाणी व्यापारी आणि विविध संघटना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार होते. यावेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक संघटनेच्या फक्त 5 लोकांना निवेदन देण्यासाठी थांबण्याची मुभा पोलिसांनी दिली होती. त्यानुसार कमीच लोक जमले होते. मात्र, मुख्यमंत्री गाडीतून उतरताना पाहताच गर्दी वाढली. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्र्याभोवती गराडा घातला.

यावेळी गोंधळ वाढत होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनीही घोषणा सुरू केल्या. त्यामुळे गोंधळ वाढला आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिणामी मुख्यमंत्र्यांना निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसावे लागले.

दोन्ही बाजूने गोंधळ वाढत गेला आणि घोषणा देत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने-सामने आले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही संघटनांनी निवेदन देता न आल्यामुळे तेथेच निवेदन फाडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. दरम्यान मुख्यमंत्री गाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पेठांमध्ये रस्त्यावर बसून निषेध नोंदवला.

Comments are closed.