Take a fresh look at your lifestyle.

मराठी बिग बॉसच्या घरात बार्शी, सोलापूरच्या सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांचं कीर्तन रंगणार!

शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी ७ वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील देखील यंदाच्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे. तरुण कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील या खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला पाटील यांची कीर्तन पाहिली जातात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत. कीर्तन या पुरुषप्रधान क्षेत्रात शिवलीला पाटील यांचं नाव प्रसिद्ध आहे. अनोख्या विनोदी शैलीत त्या कीर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर खूप चर्चा होते.

शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच त्यांना कीर्तनाचं बाळकडू मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली आहेत.

शिवलीला पाटील यांच्या व्यतिरिक्त इतरही सुप्रसिद्ध स्पर्धकांविषयी जाणून घेऊ या.

सोनाली पाटील – ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक सोनाली पाटील ठरली आहे. सोनालीने ‘देवमाणूस’, ‘वैजू नं १’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

विशाल निकम – ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी होणारा दुसरा स्पर्धक विशाल निकम आहे. विशालने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेच ज्योतिबाची भूमिका साकारली आहे.

स्नेहा वाघ – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ हिनेदेखील ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात प्रवेश केला आहे. स्नेहा तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता स्नेहाचं वागणं कसं असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. स्नेहाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

उत्कर्ष शिंदे – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे यानेदेखील ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सहभाग घेतला आहे. उत्कर्ष उत्तम गायक असण्यासोबतच तो डॉक्टरदेखील आहे.

मीरा जगन्नाथ – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. ‘येऊ कशी तशी..’मध्ये मीराने मोमो ही भूमिका साकारली असून सध्याच्या घडीला ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तृप्ती देसाई – महिलांच्या विषयांवर आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता बिग बॉस मराठी ३ च्या पर्वात सहभाग घेतला आहे.

आविष्कार दारव्हेकर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आविष्कार दारव्हेकरदेखील बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाला आहे. आविष्कारने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तो ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत झळकला होता.

सुरेखा कुडची – प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली आहे. १९९७ मध्ये सुरेखाने कलाविश्वात पदार्पण केलं.’अशी असावी सासू’, ‘भरत आला परत’, ‘तुच माझी राणी’, ‘सासुची माया’, ‘खुर्ची सम्राट’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘फॉरेनची पाटलीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

गायत्री दातार – तुला पाहते रे या मालिकेत इशा निमकर ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. अभिनेता सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या गायत्रीने आता बिग बॉस मराठी ३ च्या घरात प्रवेश केला आहे.

विकास पाटील – ‘बायको अशी हव्वी’फेम विकास पाटीलने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. विकास लोकप्रिय अभिनेता असून त्याने ‘चार दिवस सासूचे’, ‘कुलवधू’ ,’लेक माझी लाडकी’, ‘असंभव’, ‘अंतरपाट’, ‘माझीया माहेरा’, ‘सुवासिनी’, ‘मिसेस तेंडुलकर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

मीनल शाह – MTV ROADIES मध्ये झळकलेली मीनल शाह डिजिटल क्रिएटर आहे. हिंदी कलाविश्वात झळकलेली मीनल आता बिग बॉस मराठीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.

जय दुधाणे – MTV SPLITSVILLA 13मध्ये झळकलेल्या जय दुधाणे ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी झाला आहे.

अक्षय वाघमारे – अरुण गवळींचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे यंदा बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय एका गोड मुलीचा बाबा झाला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीपासून दूर राहून अक्षय या स्पर्धेत कसा टिकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

संतोष (दादुस) चौधरी– आगरी कोळी गाण्यांचा बादशाह संतोष ऊर्फ दादूस चौधरीदेखील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे.

Comments are closed.