Take a fresh look at your lifestyle.

स्वच्छता कर्मचारी शिर्डी-शिंगणापूर दर्शनासाठी रवाना

सेलू नगर परिषदेचा अभिनव उपक्रम कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण

सेलू : स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रामाणिकपणे शहर स्वच्छतेची कामे केली म्हणून स्वच्छता अभियानात सेलू नगर परिषदेचा देशात २० वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने १७५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिर्डी-शिंगणापूर दर्शनासाठी पाठविण्यात आले.

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान २०२१ अंतर्गत सेलू नगर पालिकेने देशातून २० वा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ नगर परिषदेच्या वतीने नुकतीच शहरातून ढोलताशाच्या निनादात रॅली काढून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रामाणिकपणे शहर स्वच्छतेची कामे केली म्हणून स्वच्छता अभियानात सेलू नगर परिषदेची मान उंचावली आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे व त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नगर परिषदेच्या १७५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिर्डी-शिंगणापूर दर्शनासाठी रवाना करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, लेखापाल रामराव पवार, रामकृष्ण शेरे आदींची उपस्थिती होती….

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.