Take a fresh look at your lifestyle.

सिंदफणा मध्यम प्रकल्प भरला अवघ्या चार तासात ! सिथदफणा नदीला आलाय मोठा पूर

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तसेच पाटोदा तालुक्यातील काही भागात काल (शनिवारी) रात्री प्रचंड आणि जोरदार पाऊस झाला. अलीकडच्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस असून या पावसाने शिरूर तालुक्यातील सर्वात सिंदफणा मध्यम प्रकल्प अवघ्या तीन ते चार तासात धरला आहे. .

याशिवाय सिंदफना नदीला मोठा पूर आलेला असून सदर चे पाणी माजलगाव धरणात जात असल्याने माजलगाव धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. ट्रेन पोळ्याच्या आधी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आत्महत्या नवचैतन्य निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, पाटोदा, आष्टी तालुक्यात अद्यापपर्यंत फारसा पाऊस नसल्यामुळे धरण कोरडे आहेत. पोळ्या नंतर पावसाळ्यात पाऊस कमी होतो असे मानले जाते. आतापर्यंत सर्व नद्या गाव तलाव, पाझर तलाव, मध्यम प्रकल्प कोरडेठाक होते. ह्या वर्षी अजूनही चांगला पाऊस असल्यामुळे दुष्काळ पडतो की काय अशी भीती व्यक्त केली जात असताना मागील आठवड्यात एक दिवस चांगला पाऊस झाला.

त्यानंतर काल शनिवारी रात्री पिंपळवंडी डोंगर किनी अमळनेर भांड्याचे चिंचोली चिखली यावरील शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील डोंगर पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे सिंदफणा मध्यम प्रकल्प अवघ्या चार तासात ओव्हरफ्लो होऊन सिंदफणा नदीला मोठा पूर आला आहे. गेल्या दहा वर्षातील हा सर्वात मोठा पूर असल्याचे जाणकार सांगत आहेत. सिंदफणा ला जोरदार पूर आल्यामुळे शिरूर कासार शहरासह नदीकाठच्या काही गावात पाणी शिरले आहेत.

सिंदफना नदीला आलेल्या पुराचे पाणी माजलगाव धरणात जात असून माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे. पोळ्याच्या तोंडावर मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त होत असून आता रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे मात्र खरिपातील काही पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे.

Comments are closed.