Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडायचे असे राज कुंद्राने म्हटले होते, ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई: राज कुंद्रा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून, राज कुंदरा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढतच आहेत. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने शर्लिन चोप्राची सुमारे 8 तास चौकशी केली. मुंबई गुन्हे शाखेने 160 सीआरपीसी अंतर्गत शर्लिन चोप्राला चौकशीसाठी बोलावले होते, यामुळे अभिनेत्री शुक्रवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाली. या चौकशी दरम्यान शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीबद्दल धक्कादायक विधान केले आहे.

मुंबई गुन्हे शाखेकडे आपला जबाब नोंदवल्यानंतर शरलीन चोप्राने इंडिया टूडे टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. शरलीन चोप्रा ने सांगितले की, “शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओ आणि फोटो आवडतात असे सांगून राज कुंद्राने माझी ‘दिशाभूल’ केली होती.” अभिनेत्री पुढे म्हणाली, राज माझे मेंटर होते. मी जे काही शूट करत आहे ते ग्लॅमरसाठी आहे असे सांगून त्याने माझी दिशाभूल केली.

राज कुंद्राने मला सेमी न्यूड आणि पॉर्न सामान्य असल्याचे सांगत विश्वासात घेतले…

शर्लिनने राज कुंद्रावर आरोप करत म्हटले की, त्याने मला अर्ध नग्न आणि अश्लील चित्रपट सामान्य असल्याचे सांगितले होते. प्रत्येकजण ते करतो म्हणून मी देखील केले पाहिजे, असं तो म्हणायचा.

शर्लिन पुढे म्हणाली, मला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. कुठून सुरुवात करावी आणि काय करावे हे मला माहित नव्हते. मला कधीही वाटले नव्हते की राज कुंद्रा सोबत काम केल्यावर मी एखाद्या प्रकरणात फसेल आणि मला गुन्हे शाखेसमोर बसावे लागेल.

शिल्पाला माझे व्हिडिओ आवडत होते…

शर्लिन म्हणाली की, “राज कुंद्रा मला नेहमी सांगायचे की शिल्पा शेट्टीला माझे फोटो आणि व्हिडिओ आवडतात. यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळाली. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांपासून प्रेरित होता, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आणि काय चूक आहे. जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे शिल्पा शेट्टीकडून कौतुक झाले, तेव्हा मला आणखी जास्त असे विडिओ करण्याची प्रेरणा मिळाली.”

Comments are closed.