Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार आणि नितीन गडकरी शनिवारी नगरला एकाच व्यासपीठावर…

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे शनिवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी नगर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात एकत्र येत आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भैय्या गंधी यांनी ही माहिती दिली. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा निमित्त हा कार्यक्रम होत असला तरी महाराष्ट्रातील हे दोन्ही मातब्बर नेते नेमके काय बोलतात याकडे राजकीय जाणकारांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर जवळील केडगाव परिसरातील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नगर-करमाळा- टेंभुर्णी या चार पदरी रस्त्याचे तसेच सावळीविहीर ते अहमदनगर बायपास, अहमदनगर- भिंगार रस्ता रुंदीकरण व राष्ट्रीय राखीव निधी मधील कामाचे भूमिपूजन होत आहे. याशिवाय अहमदनगर- दौंड- वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण अहमदनगर- कडा -आष्टी -जामखेड रोड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण, कोपरगाव- वैजापूर रस्ता मजबुतीकरण,

या रस्त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. एकूण 4 हजार 74 कोटी 70 लाख रुपयांची ही कामे असून नगर मध्ये कार्यक्रमात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होत आहे. नितीन गडकरी, शरद पवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, दोन्ही खासदार, सर्व आमदार तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे भैय्या गंधे यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते सुनील रामदासी, सचिन पारखी, विवेक नाईक,तुषार पोटे उपस्थित होते.

Comments are closed.