Take a fresh look at your lifestyle.

डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया आजारांनी सेलूकरांना “ताप” —प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्त

सेलू :- कोरोनाची लढाई सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या रोगांनी सेलूकर फणफणले आहेत. घरोघरी एकतरी रुग्ण आढळून येत असून प्रशासकीय आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त दिसत आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासन कोट्यवधींची तरतूद करत असते पण हे पैसे जातात तरी कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षात डास प्रतिबंधकासाठी कोट्यवधींची धूर आणि औषध फवारणी झाली. तरीही साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. प्रशासनाच्या या ढिम्म यंत्रणेला नागरिकांचा जीव गेल्यावर जाग येणार का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. त्यातून धूर आणि औषध फवारणीही करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, तरीही डेंगी, हिवताप, चिकनगुनिया सारख्या रोगांचे थैमान शहरात सुरू आहे. डासांचे निर्मुलन करण्यासाठी औषधांची फवारणी केली जाते मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नाही असे चित्र आहे. औषध फवारणीच्या नियोजनाचे कागदी घोडे नाचवण्यापुरताच आरोग्य विभाग काम करतो की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात फवारणी करूनही डासांचे निर्मुलन होत नसेल तर कंपन्यांकडून दर्जाहीन औषधे खरेदी केली जातात का ? असा सवाल उपस्थित होत आहे. चिकनगुनिया, डेंग्यु, मलेरिया या सारख्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सकाळच्या टप्प्यात औषध फवारणी आणि सायंकाळी धूर फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रभागनिहाय तापसणी पथके तैनात करून संशयितांची तत्काळ चाचणी करण्यात यावी अशी मागणी सेलूकरांची आहे…

पुर्ण…. डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.