Take a fresh look at your lifestyle.

मोटारसायकलच्या धडकेत एक ठार; एक जखमी सेलू-वालूर रस्त्यावरील घटना

सेलू :- सेलू -वालुर रस्त्यावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे यात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही अपघाती घटना मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली.

अपघाताची माहिती कळताच पोलिस आणि रुग्णवाहिकेचा चालक यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांनाही उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी बापुराव शामराव क-हाळे (वय ३२वर्षे) या गंभीर जखमीस तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचे निधन झाले. तर अशोक नामदेव शिंदे (वय ५५ वर्ष) राहणार दोघे पारडी कौसडी असे अपघाता मधील जखमीचे नाव आहेत. सेलू वरून पार्डी कौसडी येथे जाण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच २१ बी.सी.६०५१ वरून अशोक नामदेव शिंदे व बापुराव शामराव क-हाळे हे दोघे जण जात असताना वालुर रस्त्यावर नव्याने होत असलेल्या कनश्री या कंपनी जवळ या दुचाकी ला अपघात झाला. या अपघातात बापुराव शामराव क-हाळे यांचे निधन झाले आहे. तर अशोक नामदेव शिंदे यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास कार्य पोलीस करत आहेत.

पुर्ण…. डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.