Take a fresh look at your lifestyle.

बदलत्या वातावरणामुळे सेलूत सर्दी-खोकल्याचे रूग्ण वाढले .सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखानेही हाऊसफुल!

सेलू :- आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रूग्णांचीही सध्या सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखान्यातही गर्दी वाढत आहे.

कधी ऊन, कधी नुसते ढगाळ वातावरण तर कधी पाऊस यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरीकांच्या आरोग्यावर या वातावरणाचा परिणाम होऊन घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण वाढत आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने, गावागावात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. उपचारासाठी रूग्णालयांत गर्दी वाढली आहे. सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले असून यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांमुळे सध्या दवाखाने हाऊसफुल होत आहेत…

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.