Take a fresh look at your lifestyle.

सेलूत मोकाट जनावरांचा हैदोस, नागरीकांसह वाहनचालकांमध्ये भीती

सेलू (डाॅ विलास मोरे) :- मराठवाड्यातील पुणे समजल्या जाणाऱ्या सेलू शहराची लोकसंख्या ५५ ते ६० हजाराच्या आपसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमुळे रस्त्यांवर गर्दी होत असताना त्यात आता मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचीही भर पडली आहे. कधी कुठले जनावर वाहनाला आडवे येईल हे सांगता येत नाही. यामुळे दररोज कुठे ना कुठे अपघातांच्या घटना घडत असतात. बसस्टॅन्ड परिसर व क्रांतीचौकात तर मोकाट जनावरांचा हैदोस धडकी भरविणारा असतो.

सेलू शहरात सर्वत्र सार्वजनिक रस्त्यावर मोकाट जनावरे, कुत्रे, गाढवे, डुकरे आदी मोकाट जनावरांचा मुक्त संचारामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. शहरातील रेल्वे स्टेशनपासून बसस्टॅन्ड समोरुन रायगड काॅर्नर, स्टेशन रोड, नुतन रोड, बाजार रोड आदी प्रमुख परिसरासह शहरातील इतर अनेक भागांमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस धडकी भरविणारा ठरत असून नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

शहरात भरणारा आठवडी बाजार आणि दररोज भरणाऱ्या भाजीबाजार आणि फळांच्या दुकानाच्या आसपास विक्रेते, दुकानदार उरलेला भाजीपाला टाकून देतात. एकाचवेळी १५-२० गायी, म्हशी फेकलेल्या भाजीपाल्यांवर तुडून पडतात. कधी कधी तर दुकानात मांडलेला भाजीपालाही ओढून नेतात. बसस्टॅन्ड समोरील परिसरात तर रात्रंदिवस जनावरे समूहाने रस्त्यावर उभी असतात. आगोदरच रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यात फळविक्रेत्यांचे ठेले रस्त्याच्या मध्यापर्यंत असतात. जनावरांना हाकलल्यास ते सैरावैर धावतात. परिणामी अपघाताची दाट शक्यता असते.

चौकटीचा मजकूर…

सेलू शहरात दरवर्षीच पावसाळ्यात ही समस्या तीव्रतेने जाणवते. कुत्र्यांची संख्याही चांगलीच वाढली आहे. कुत्री अंगावर धावत असल्याने रस्त्याने एकटे जाताना नेहमीच मनात भीती असते. अनेक भागात गायी समूहाने रस्त्यावरच ठाण मांडून असतात. यामुळे जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. ही अनेक वर्षांची समस्या असूनही कुणी लक्ष देत नाही. ही शोकांतीकाच आहे.

— अभिजित राजुरकर, मोरया प्रतिष्ठान सेलू

महिला व बालकांना धोका

(मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा महिला बालके आणि मुलांना सर्वाधिक धोका असतो. झुंडीने फिरणाऱ्या जनावरांच्या पायाखाली तुडविले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे लहान मुलांना एकटे सोडण्यास पालक घाबरतात.)

Comments are closed.